Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन विधानसभेसाठी मातोश्रीचा विश्वासू सेनापती विनोद घोसाळकर रिंगणात !

माणगाव , कोकण दर्पण वृत्तसेवा : श्रीवर्धन मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शिवसेना उपनेते म्हाडा सभापती डॉ. विनोदजी घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून रायगड सुपुत्र असलेले दक्षिण रायगडमध्ये खऱ्या अर्थाने पक्ष वाढवण्याचे काम घोसाळकर यांच्या माध्यमातून झाले आहे.
शिवसेना शाखाप्रमुख ते म्हाडा सभापती राज्यमंत्री दर्जा असा चाळीस वर्षाचा राजकीय प्रवास, शिवसेनेचे एकनिष्ठ हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे निकटवर्ती, मुंबईत पश्चिम उपनगरात खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला राखून ठेवण्याचे काम 35 वर्ष विभाग प्रमुख या नात्याने उपनगराचा बुलंद आवाज टिकून ठेवण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून घोसाळकर यांनी केले व मुंबई महापालिकेत सर्वधिक नगरसेवक निवडून देण्याचा विक्रम त्यांच्या काळात झाला आहे.
वर्षभरा पूर्वी गृहनिर्माण इमारत दुरूस्ती व पुनःर्रचना मंडळाच्या सभापती (राज्यमंत्री दर्जा )या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.
मुंबई चे मूळ मराठी बांधव मुंबई सोडून जाऊ नये म्हणून वर्षातच मुंबईतील बेघर जनतेला घर मिळवून देण्याचे मोठे काम, तसेच कित्येक वर्षे रखडलेले इमारतीची दुरूस्तीची कामे, नवीन इमारत बांधणीचे कामे मार्गी लावली तसेच येणारा काळात मिल कामगारांना देखील हक्काची घरे मिळवून देण्याच्या कामाला सुरूवात केली आहे.
दहिसर विधानसभेचे प्रथम आमदार म्हणून पाच वर्षात दहिसरचा कायापालट करून दहिसरच्या विकासामध्ये नाट्य रसिकांसाठी प्रबोधनकार नाट्यगृह, मुंबईचे दशकातील प्रवेशद्वार उभारणी, दहिसर नदीचे रुंदीकरण, दहिसर पूर्व पश्चिम जोडण्यासाठी बांधण्यात आलेले उड्डाणपूल, आरोग्याच्या दृष्टिकोनातून भगवती रुग्णालय हायटेक करण्याचे व पाया रचण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला सुरुवात करून देणारे, दहिसर अग्निशामक केंद्र, कांदरपाडाअग्निशामक केंद्र, शिधा पत्रक कार्यालय, दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन च्या माध्यमातून देश तसेच राज्य पातळीवर अनेक खेळाडू घडविण्याचे काम, तसेच गर्जतो मराठी या माध्यमातून साधारण २००० तरुणांना शासकीय, बॅंकिंग व खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध करून देण्याचे काम, नागरिकांना तरण तलाव (स्विमिंग पूल), ज्येष्ठांसाठी व महिलांसाठी ज्येष्ठ नागरिक केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय (लायब्ररी), दहिसरमध्ये विविध उद्यानांचा विकास घोसाळकर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात करण्यात आला आहे. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक कामगारांचे प्रश्न व युनियनच्या समस्या यांवर तोडगा काढून न्याय देण्याचे काम उपाध्यक्ष या नात्याने ते करत आहेत.
मुंबई उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती सचिव या नात्याने गेली कित्येक वर्ष उपनगरातील विविध गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांच्यामार्फत झाले आहे.
अष्टपैलू नेतृत्व असलेले व कोणते ही आव्हान पेलू कापल्या कामाला न्याय देणारे ठाकरे घराण्याचे विश्वासू सेनापती पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचे मातोश्रीने ठरवाले आहे.
घोसावळकरांना श्रीवर्धन मतदार संघातून उमेदवारी देऊन भ्रष्टाचाराच्या चिंधड्या करणाऱ्या घराणेशाहीला गाडण्यासाठी, बाळासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी व श्रीवर्धन वर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेच्या ठाण्यावाघाला उमेदवारी जाहीर केल्याचे दिसून येते .
सर्व जाती-धर्मातील समाजाला एकत्र करून श्रीवर्धन चा सर्वांगीण विकास व नागरिकांना हक्काचा आमदार घोसाळककांच्या माध्यमातुन मिळाणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसैनिका पदाधिकारी व नागरिक करत आहेत.

कोकण दर्पण.