Press "Enter" to skip to content

मंदाताई , जाईंट किलर आणि आता मुत्सद्दी राजकारणी ! बेलापूर गड लढण्यासाठी सज्ज !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : भाजपच्या बेलापूर विधानसभेतील आमदार मंदाताई म्हात्रे या २०१४ साली माजी मंत्री गणेश नाईक यांना पराभूत करून महाराष्ट्रातील राजकारणात जाईंट किलर ठरल्या होत्या. २०१९ मधील विधानसभा निवडुकीत मोठ्या मुत्सद्दीने बेलापूरची उमेदवारी मिळवून भाजपात आलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांना आणखी एक धक्का दिला आहे. बेलापूरची उमेदवारी मिळविली आता बेलापूर मधून विजयश्री देखील मिळविणार असा विश्वास व्यक्त करीत बेलापूर गड लढण्यासाठी मंदाताई सज्ज झाल्या आहेत.
नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकारणातील हे धडाडीचे आणि समाजभिमुख नेतृत्व म्हणजे मंदाताई म्हात्रे आहेत. राष्ट्रवादीतून भाजपात आल्यानंतर नवी मुंबईत भाजपला घराघरात पोहचविण्याचे काम मंदाताईंनी केले. आपल्या समोर गणेश नाईक सारखा भक्कम नेता राजकीय विरोधक असून देखील मंदाताईंनी नेहमी कुशलपणे नेतृत्व केले आहे. अशातच या निवडणुकीत विरोधक असलेले माजी मंत्री गणेश नाईक भाजपात आल्याने बेलापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचा पेच वाढला. गणेश नाईक आणि संदीप नाईक यांनी बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदार संघासाठी फिल्डींग लावली होती. मात्र मंदाताईंची यशस्वी कारकीर्द आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक गणेश नाईकांच्या फिल्डींगला हरवून गेली. आता मंदाताई यांच्यापुढे स्वकीय विरोधक आणि विरोधी पक्षातील विरोधक यांना हरविण्याचे दुहेरी आव्हान आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »