Press "Enter" to skip to content

बेलापूर गड जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांची जोरदार मोर्चेबांधणी !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर विधानसभा गड जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. नवी मुंबईतील राजकीय घडामोडीनंतर मोठ्या संख्येने युवा पिढी अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात सक्रिय झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबई जिल्ह्याची जबाबदारी अशोक गावडे यांच्या खांद्यावर सोपविल्यानंतर दिवसरात्र एक करूनअशोक गावडे यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली. गावडे यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या हाकेला कार्यकर्ते धावून आलेच मात्र नवी मुंबईतील युवा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने राष्ट्रवादीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोराने वाहू लागले असताना विरोधकांना टक्कर देण्यासाठी बेलापूर विधानसभा मतदार संघातून अशोक गावडे यांनी स्वतःच निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने बेलापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. नेरुळ येथील भव्य कार्यकर्ता मेळाव्याला नवी मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून अशोक गावडे यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय केले आहे. बेलापूर आणि ऐरोली विधानसभा या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादीचे सच्चे आणि तळागाळातील कार्यकर्ते आपली ताकत दाखवून देतील, असा विश्वास अशोक गावडे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »