पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : शेकापचे खारघर ग्रामपंचायतीतील माजी उपसरपंच संजय घरत यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी भाजपात प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सदर प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी भाजप नेते वाय टी देशमुख , जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल , सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नरेश ठाकूर , ऍड संध्या शारबिद्रे आदी उपस्थित होते.
संजय घरत हे मागील अनेक वर्षांपासून शेकाप मध्ये कार्यरत होते. उच्च शिक्षित असलेले संजय घरत हे खारघर शहरातील एक युवा नेता म्हणून कार्यरत होते. सामाजिक कार्यातून समाजकारण असे सूत्र अवलंबून त्यांनी काम केले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन संजय घरत यांनी भाजपात प्रवेश केला.
कोकण दर्पण .





