पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा मतदार सांगातून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हरेश केणी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केणी हे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात थेट लढत.
लोकसभा निवडणुकीपासून शेकापने प्रीतम म्हात्रे यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून उमेद्वारीसाठी निश्चित केली होती. मात्र, प्रीतम म्हात्रे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने उमेदवारी कोणाला द्यावी, असा पेच शेकाप पुढे निर्माण झाला होता. भाजपचे प्रशांत ठाकूर यांना टक्कर देण्यासाठी आमदार बाळाराम पाटील यांनी लढावे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. तर शेकाप नेते काशीनाथ पाटील, अरविंद म्हात्रे आणि हरिश केणी यांची नावे चर्चित होती. अखेर पक्षाने केणी यांचे नाव आज निश्चित केले.
दरम्यान, आता खऱ्या अर्थाने पनवेल विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
कोकण दर्पण.





