कर्जत- खोपोली विधानसभा मतदार संघातील अनेक प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र मुद्यांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना ते प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. कर्जत आणि खोपोली तालुक्यातील नागरीप्रश्न आणि विकासाला खऱ्या अर्थाने गती देणारा आमदार जनतेला हवा आहे. कर्जत , खोपोली आणि नेरळ मधील अनेक प्रश्न गंभीर आहेत. खोपोलीकरांना सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे आरोग्याचा. खोपोलीत अत्याधुनिक सोयीसुविधांनी असलेले शासकीय रुग्णालय हवे आहे. कर्जत मधील कोंढाणे धरण, कर्जत-पनवेल लोकलचा प्रश्न तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे , आदिवासी वाड्या पाडयाचे पाणी प्रश्न , रोजगार निर्मितीसाठी वेगळे प्रयत्न , सुरळीत वीज पुरवठा, नेरळ मधील पर्यटन विकासाला गती देणारा आमदार कर्जत -खोपोली विधानसभा मतदार संघातील जनतेला हवा आहे.
कोकण दर्पण.





