नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बांधणी सुरु असताना राष्ट्रवादीने बेलापूर विधानसभा मतदार संघासह ऐरोली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्तनामध्ये जोश भरण्यासाठी नुकताच कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी मतभेद बाजूला ठेऊन कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक गावडे उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांच्या पुढाकाराने शेतकरी समाज हॉल कोपर खैरणे येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्याध्यक्ष जी एस पाटील, मच्छिमार सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंदु पाटील ,जिल्हा चिटणीस व प्रवक्ते अफसर ईमाम, उत्तर भारतीय सेल जिल्हा अध्यक्ष संतोष हलवाई, महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी घाडगे, नवी मुंबई परिवहन सदस्य राजेंद्र ईंगळे, अशोक सूर्यवंशी सचिव नवी मुंबई जिल्हा, अवधेश शुक्ला महिला आघाडी साधना ढवळे शारदा आरखडे आदी उपस्थित होते.
मल्लिकार्जुन पुजारी यांनी नुकताच वंचितनधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मागील लोकसभेचे ते उमेदवार होते.पुजारी यांच्या पुढाकाराने सदर मेळाव्याचे आयोजन झाल्याने पुजारी हे देखील ऐरोली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवी मुंबई जिल्ह्यातील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस त्याच ताकतीने उभी आहे , त्यामुळे कार्यकर्तांनी आपला आत्मविश्वास आणखी वाढवून जोमाने कामाला लागा, असे असे आवाहन अशोक गावडे यांनी देखील केले.
फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची परंपरा कायम राखणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि ऐरोली मध्ये राष्ट्रवादीची ताकत आणखी वाढवू , असा विश्वास आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.
कोकण दर्पण.





