Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीची ऐरोली विधानसभेत मोर्चेबांधणी ! २७ सप्टेंबरला कोपरखैरणे येथे कार्यकर्ता मेळावा !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने बेलापूर विधानसभा मतदार संघात पक्ष बांधणी केल्यानंतर आता राष्ट्रवादीची ऐरोली विधानसभेत मोर्चेबांधणी सुरु आहे. त्या अनुषंगाने २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉल मध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांच्या वतीने सदर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे काही नेते पक्ष सोडून गेले मात्र राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता अद्यापि पक्षनिष्ठा बाळगून आहे. त्यांच्या जीवावर आम्ही पक्ष पुन्हा नव्याने उभारू असा विश्वास पुजारी यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला. सदर मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड , आमदार शशिकांत शिंदे , नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे तसेच इतर नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे पुजारी यांनी सांगितले.

कोकण दर्पण.