कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील जनतेला कल्याणच्या विकासाचे नवे मॉडेल देणारा आमदार हवा आहे. जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने कल्याणच्या विकासासाठी शासन, प्रशासनावर अंकुश ठेवणारा आमदार आम्हाला हवाय, प्रतिक्रिया कल्याण पश्चिम मधील जनतेने व्यक्त केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या येथील जनतेच्या मानगुटीवर बसली आहे. येथील डमिंग ग्राऊंडची मोठी समस्या आहे. यामुळे कल्याण पश्चिम क्षेत्रात राहणारी जनता अनेक वर्षांपासून त्रस्त आहे. कल्याण पश्चिमेकडून नवी मुंबईकडे जाणारा पत्री पूल आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही कल्याणकरांची मोठी डोकेदुखी
आहे. तीच परिस्थिती ठाणे आणि नाशिककडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. डम्पिंग ग्राउंड लोकवस्ती पासून अन्यत्र हलविण्यासाठी जनतेकडून वारंवार मागणी होतेय. या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारा आमदार येथील जनतेला हवाय.
कल्याण पाश्चिमेकडे असलेला एसटी बसडेपोची दयनीय अवस्था आहे. डेपोमध्ये मोठ्याप्रमाणात अस्वच्छता आहे. त्यामुळे प्रवाशांची नेहमी गैरसोय होते. त्याव्यतिरिक्त रस्ते, दिवाबतयी, गटारे अशा नागरिसुविधानची येथे वाणवा आहे. अत्याधुनिक सोईसुविधानी असलेले रुग्णालय जनतेला देणारा आमदार कल्याण पश्चिम मधील जनतेला हवाय.
कोकण दर्पण.





