Press "Enter" to skip to content

शरद पवार ईडी कारवाई विरोधात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी आक्रमक ! २६ सप्टेंबर रोजी वाशी येथे करणार जाहीर निदर्शने !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.! सदर कारवाईच्या निषेधार्थ उध्या २६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाशी येथे जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत. जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली सदर निदर्शने करण्यात येणार आहेत.
शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने ७० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शरद पवार हे या बँकेच्या संचालक बोर्डावर नसताना देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीत भाजप सरकारने ईडीच्या माध्यमातून सुडाचे राजकारण केले असल्याची टीका जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी केली आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता वाशी येथे जाहीर निदर्शने करण्यात येणार आहेत.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »