पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील धडाडीचे नेते हाजी शाहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागामध्ये एमआयएम विध्यार्थी विंग बांधणीला वेग आला आहे. एमआयएम पक्षाने हाजी शाहनवाज खान यांच्यावर एमआयएम स्टुडन्ट विंग कोकण विभाग निरीक्षक पदाची जबाबदारी दिल्यानंतर खान यांनी पक्ष बांधणीला आणखी नियोजनबद्ध केले आहे.
संपूर्ण कोकण विभागात विध्यार्थी विंग उभी करण्यासाठी अनेक विध्यार्थ्यांना त्यांनी एमआयएम स्टुडन्ट विंग मध्ये समाविष्ट केले आहे. हाजी खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक विध्यार्थी देखील एमआयएम पक्षात सहभागी होत आहेत.
महाराष्ट्रातील शाळा आणि कॉलेजमधील विविध प्रश्नावर आम्ही काम करत असल्याचे खान यांनी सांगितले.
कोकण दर्पण





