Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि संविधानिक शिक्षण देण्याची गरज – हाजी शाहनवाज खान !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकातून अधिकाधिक ऐतिहासिक आणि संविधानिक शिक्षण देण्याची गरज आहे, अशी भूमिका एमआयएम स्टुडेंट विंगचे कोकण विभागीय निरीक्षक हाजी शाहनवाज खान यांनी मांडली आहे.

आज आधुनिक शिक्षणाच्या नावावर विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फिज उकळली जाते, मात्र शिक्षण मिळत नाही, हे भयाण सत्य आपणास नाकारता येणार नाही, असे देखील खान यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना करियर निर्माण करणारे शिक्षण देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आजचे विध्यार्थी देशातल्या ऐतिहासिक शिक्षणापासून दूर आहेत. लोकशाही आणि संविधानिक शिक्षणाचे ज्ञान कमी आहे. देशाच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी ऐतिहासिक आणि संविधानिक शिक्षण पाठक्रमातून मोठ्या प्रमाणात द्यावे, अशी मागणी देखील खान यांनी केली आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »