Press "Enter" to skip to content

नवी मुंबई राष्ट्रवादीची भिस्त आता अशोक गावडे यांच्यावर !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची भिस्त आता जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यावर आहे. त्यामुळे नवी मुंबईत पक्ष बांधणीसाठी अशोक गावडे यांनी जोरदार आखणी केली आहे. अशोक गावडे यांची रणनीती विधानसभा निवडणुकीत नक्कीच परिणामकारक ठरेल असे चित्र आहे.

माजी मंत्री गणेश नाईक यांच्या पक्षांतरांनंतर राष्ट्रवादीचे सामान्य कार्यकर्ते गोंधळून गेले होते. मात्र, पक्ष नेतृत्वाने नवी मुंबईची जबाबदारी अशोक गावडे यांच्यासारख्या खंबीर नेत्याकडे सोपविली. अशोक गावडे यांनी देखील मोठ्या विश्वासाने नवी मुंबईची जबाबदारी स्वीकारून पक्ष बांधणीच्या कामाला लागले. नेरुळ , नवी मुंबईत झालेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा त्याचेच दवोतक होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »