Press "Enter" to skip to content

जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई राष्ट्रवादी बांधणीला वेग !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्फूर्ती दिल्यानंतर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई राष्ट्रवादी बांधणीला वेग आला आहे. अशोक गावडे यांनी कार्यकर्त्याना मोठ्या प्रमाणात सक्रिय केले असून सर्व कार्यकर्ते देखील जोमाने कामाला लागले आहेत.

नवी मुंबईत राजकीय उलथापालत झाल्यानंतर जणू नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठे संकट कोसळले. मात्र, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पक्षाची संपूर्ण जबाबदारी घेत नेरुळ नवी मुंबईत जाहीर कार्यकर्ता मेळावा लावला. सदर मेळाव्याला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी करकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. हाच धागा धरून अशोक गावडे जोमाने कामाला लागले आहेत. जो पर्यंत माझ्या सारखा सच्चा मावळा जिवंत आहे, तोपर्यंत नवी मुंबईत राष्ट्रवादीला कोणी संपविण्याची भाषा करू नये, त्यांचे प्रयत्न फोल ठरतील, अशी प्रतिक्रिया अशोक गावडे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली. या विधानसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली मतदार संघात ते दाखवून देऊ, असे देखील अशोक गावडे यांनी नमूद केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »