Press "Enter" to skip to content

मुरबाड मतदार संघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादी एकवटली !

मुरबाड, कोकण दर्पण वृत्तसेवा : मुरबाड विधानसभा मतदार संघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाडमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटली आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांना विजयी करण्याचा निश्चिय केला.
मुरबाड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीला विजयश्री मिळवून देण्यासाठी मुरबाड मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच मुरबाड येथील नमस्कार सभागृहात बैठक झाली.

मुरबाड मतदार संघाच्या आणि संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी मुरबाड विधानसभा मतदार संघमध्ये सत्तापरिवर्ण होणे गरजेचे आहे, त्यामुळे नेटाने कामाला लागा, असे आवाहन प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्याना केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »