Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लढाई – जिल्हाध्यक्ष अशोक गावडे !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचे वातावरण अगदी तापू लागले आहे. सर्वच पक्षात उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत खलबत्ते सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची बेलापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबईतील स्वाभिमानासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली असून मतदार राजा राष्ट्रवादीवरील विश्वास कायम असल्याचे दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया अशोक गावडे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.
देशाचे आणि राज्याचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास झाला. मात्र राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा विश्वासघात करण्यात आला. जनता पाहून आहे आणि ओळखून देखील आहे, त्यामुळे जनता मायबाप न्याय करेल , असा विश्वास देखील अशोक गावडे यांनी व्यक्त केला.
दरम्यान , अशोक गावडे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यामुळे बेलापूर मतदार संघात मोठी चुरस होणार आहे. अशोक गावडे हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई आणि विशेषतः बेलापूर विधानसभा मतदार संघातसार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत.

कोकण दर्पण.