मुरबाड, कोकण दर्पण वृत्तसेवा : मुरबाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. दरम्यान ,प्रमोद हिंदुराव यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने पक्का निर्धार केला आहे.
मुरबाड मतदार संघात प्रचाराची रणनीती आखण्याच्या अनुषंगाने १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुरबाड येथील नमस्कार हॉल मध्ये गोटीराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमोद हिंदुराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. मुरबाड विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढत असल्याने मुरबाड मधील जनतेने त्यांना उत्स्फूर्तपणे शुभेच्छा दिल्या. जनतेचा विश्वास पाहून हिंदुराव देखील जोमाने कामाला लागले आहेत. आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ सार्वजनिक जीवनासाठी दिला. समाजाचे प्रश्न सोडविणे याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत प्रमोद हिंदुराव यांना नकक्किच जनता साथ येईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
कोकण दर्पण





