Press "Enter" to skip to content

एमआयएम सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद ! एका दिवसात ५०० हुन अधिक सभासदांची नोंद !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : एमआयएम पक्षाच्या सदस्य नोंदणीला नवी मुंबई शहरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी झालेल्या सदस्य नोंदणीत एका दिवसात ५०० हून अधिक सभासदांची नोंद झाल्याची माहिती एमआयएम नवी मुंबई जिल्ह्या अध्यक्ष हरमीत सिंग यांनी पत्रकारांना दिली.
नवी मुंबईमध्ये पक्ष बांधणीच्या अनुषंगाने एमआयएमच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी अनेक सदस्यांना कोकण विभाग अध्यक्ष हाजी अकरम खान यांच्या हस्ते सदस्यत्व देण्यात आले.
एमआयएम हा सामान्य जनतेचा पक्ष आहे , सर्व समाजाचे लोक एमआयएममध्ये सक्रिय असून नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई जिल्ह्या अध्यक्ष हरमीत सिंग यांनी व्यक्त केली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »