विधानसभा निवडणूक लढण्यासाठी एमआयएम सज्ज असून संपूर्ण कोकणातील विधानसभा मतदार संघात उमदेवार देण्याची आमची तयारी आहे, अशी माहिती एमआयएम कोकण विभाग अध्यक्ष हाजी अकरम खान यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.
बेलापूर, ऐरोली, पनवेल उरण, कर्जत विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी एमआयएमची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून लवकरच वरिष्ठांच्या आदेशाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाईल असे देखील खान यांनी सांगितले.
कोकण दर्पण.





