Press "Enter" to skip to content

एमआयएम पनवेल तालुका अध्यक्षपदी आसिम पटेल यांची निवड !!

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : एमआयएम पक्षाच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी आसिम पटेल यांची निवड करण्यात आली आहे. एमआयएम नवी मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीत आसिम पटेल यांना नियुक्त पत्र देऊन एमआयएम कोकण विभाग अध्यक्ष हाजी अकरम खान यांनी आसिम पटेल यांच्यावर जबाबदारी दिली. यावेळी जेष्ठ सामाजिक नेते असलम खान, नवी मुंबई अध्यक्ष हरमीत सिंग उपस्थित होते.

आसिम पटेल हे २००४ पासून पनवेल तालुक्यातील समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत. २०१४ साली त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. पनवेल तालुक्यात एमआयएम पक्षाला उभारी देण्यासाठी हसीम पटेल काम करत आहेत. त्यांना आणखी ताकत देण्यासाठी एमआयएम पक्षाने त्यांच्यावर पनवेल तालुक्याची जबाबदारी दिली आहे.

एमआयएम हा पक्ष भारतीय संविधान आणि लोकशाही मानणारा पक्ष आहे. खऱ्या अर्थाने हा सर्व समाजाचा पक्ष आहे. पनवेल तालुक्यात पक्ष वाढविण्यासाठी मी प्रामाणिकपणे मेहनत घेईन असा विश्वास आसिम पटेल यांनी व्यक्त केला. पनवेल तालुक्यातील नागरिकांनी आणि विशेषतः युवांनी एमआयएमचे सदस्य बनावे , असे आवाहन आसिम पटेल यांनी यावेळी कोकण दर्पणशी बोलताना केले.

कोकण दर्पण.