Press "Enter" to skip to content

हाजी शाहनवाज खान यांची एमआयएम स्टुडेंट विंगच्या कोकण विभाग निरीक्षक पदी निवड !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : हाजी शाहनवाज खान यांची एमआयएम स्टुडेंट विंगच्या कोकण विभाग निरीक्षक पदी आज नियुक्ती करण्यात आली. एमआयएम महाराष्ट्र स्टुडेंट विंगचे अध्यक्ष कुणाल खरात यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खान यांची नियुक्ती जाहीर केली .

महाराष्ट्रामध्ये एमआयएम विध्यार्थी विंग मोठ्या सक्रीयतेने कार्यरत असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही काम करणार असल्याचे कुणाल खरात यांनी यावेळी सांगितले. राज्यामध्ये शिक्षणाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती गंभीर आहे, खाजगी शाळांमध्ये मोठी लूट सुरू आहे, कॉलेजचे अनेक प्रश्न आहेत, अशा अनेक प्रश्नावर महाराष्ट्रभर एमआयएम विध्यार्थी विंग काम करत असल्याचे खरात म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीत स्टुडेंट विंग मधील काही सक्षम उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी एमआयएमचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा खासदार इम्तिहाज जलील यांच्याकडे केली असल्याचे देखील खरात म्हणाले.
यावेळी पनवेल उप जिल्हा रुग्णालयाबाबत शाहनवाज खान यांनी प्रश्न उपस्थित केला. सदर जमीन ही वफकची, देवस्थानची असून याबाबत न्यायालयात याचिका दाखल आहे. असे असताना शासनाने येथे हॉस्पिटल कसे बांधले, असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »