Press "Enter" to skip to content

भाजपने उरणमध्ये युतीधर्म न पाळल्यास शिवसेना पनवेलमध्ये पलटवार करण्याच्या तयारीत ?

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. आपली उमेदवारी शाबूत ठेवण्यासाठी सर्वच पक्षतील उमेदवारांनी हालचाली सुरु केल्या आहेत. भाजप-शिवसेनेची युती जाहीर झाली असली तरी अनेक मतदार संघात बंडाळी आणि कुरघोडी होण्याची शक्यता आहे. उरण मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर असताना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी उरण मतदार संघातून निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केली आहे. भाजप जेष्ठ नेत्यांनी देखील महेश बालदी यांच्या उमेदवारीसाठी पुष्टी दिली आहे . त्यामुळे शिवसेनेला उरणमध्ये मोठी अडचण होणार आहे. दरम्यान , भाजपने जर उरणमध्ये युतीधर्म न पाळल्यास शिवसेना देखील पनवेलमध्ये पलटवार करू शकते , अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये भाजपने आपला प्रभाव निर्माण केला आहे. पनवेल विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्यकतृत्वाचा पनवेल मध्ये मोठा प्रभाव आहे. आमदार प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभा मतदार संघातून हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र , पनवेल मतदार संघाबरोबर उरण मतदार संघात देखील भाजप आपले अस्तित्व दाखवू इच्छित आहे. भाजपचे नेते महेश बालदी यांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शविल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भाजपने उरणमध्ये युतीधर्म न पाळल्यास पनवेल मध्ये आम्ही युती धर्म का पाळावा , अशी चर्चा सध्या पनवेल आणि उरण शिवसेनेमध्ये सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या युतीमध्ये खलबत्ते सुरु आहेत. युतीचे ठरले असले तरी जागा वाटपावरून काहीही होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र युतीत बिघाड झाल्यास  उरणमध्ये भाजप, शिवसेना , काँग्रेस , शेकाप अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर पनवेल मतदार संघात मध्ये रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत शिवसेनेच्या वतीने निवडुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, आम्ही वरील आदेशाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.

पनवेल मतदार संघात लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचा मोठा प्रभाव आहे. पक्ष बांधणी आणि निवडणूक नियोजन यामुळे पनवेलमध्ये भाजपाची पाळेमुळे मजबूत झाली आहेत. पनवेलच्या सार्वजनिक जीवनात लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्थान आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना टक्कर देणे तितके सोपे नाही , हि देखील वस्तुस्थिती आहे.

पनवेल मतदार संघात लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचा मोठा प्रभाव आहे. पक्ष बांधणी आणि निवडणूक नियोजन यामुळे पनवेलमध्ये भाजपाची पाळेमुळे मजबूत केली झाली आहेत. पनवेलच्या सार्वजनिक जीवनात लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्थान आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना टक्कर देणे तितके सोपे नाही , हि देखील वस्तुस्थिती आहे.

दरम्यान , घोडा मैदान अगदी जवळ आहे. पनवेल आणि उरण मतदार संघात मतदार कोणाला कौल देतील हे येणार काळच ठरवेल.

कोकण दर्पण.