

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातून नवी मुंबईचे माजी उपमहापौर , जेष्ठ नगरसेवक तथा नवी मुंबा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची राष्ट्रवादीची तयारी सुरु आहे. त्याप्रमाणे राष्टवादी काँग्रेसची नेते मंडळी रणनीती आखत असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. अशोक गावडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत म्हणून मानले जातात. मागील अनेक वर्षांपासून ते नवी महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. बेलापूर मतदार संघात राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे. नेरूळचा बालेकिल्ला अशोक गावडे हे स्वतः सांभाळत आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने अशोक गावडे यांनी देखील तयारी दर्शवली आहे.
माजी मंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला नवी मुंबईत उभारी मिळाली. गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई राष्ट्रवादी असे समीकरण होते.मात्र देशात आणि राज्यात भाजपचे वादळ उठल्याने मागच्या निवडणुकीत गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांची समीकरणे चुकली. त्यामुळे आणखी राजकीय नुकसान सोसावे लागू नये म्हणून गणेश नाईक यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. सध्या नवी मुंबई राष्टवादी काँग्रेसची धुरा अशोक गावडे यांच्या खांद्यावर आहे. नवी मुंबईच्या आणि विशेषतः बेलापूर विधानसभा मतदार संघात त्यांचा प्रभाव आहे. येथे राष्ठ्रवादी काँग्रेसचा जुना मतदार आहे. त्यामुळे बेलापूर मतदार संघातून अशोक गावडे हे आघाडीच्या वतीने उमेदवार असतील हे स्पष्ट आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने देखील विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. बेलापूर मतदार संघातून सामाजिक नेते वीरेंद्र लगाडे यांच्या नावाची चर्चा आहे. वीरेंद्र लगाडे हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई मध्ये सामाजिक कार्य करीत आहेत.
त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आघाडीकडन अशोक गावडे तर वंचितच्या कडून वीरेंद्र लगाडे निवडणुकीच्या मैदानात असतील असे चित्र आहे.
कोकण दर्पण.





