Press "Enter" to skip to content

वंचित बहुजन आघाडीचा सरकारला इशारा ! प्रॉपर्टी कार्ड द्या अन्यथा आंदोलन करू ! वंचित बहुजन आघाडीची आक्रमक भूमिका !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : प्रॉपर्टी कार्ड द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू , अशी आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवी मुंबईत घणसोली येथे जमीन हक्क परिषद रविवारी संपन्न झाली. वंचित बहुजन आघाडीचे नेते राजाराम पाटील यांनी प्रॉपर्टी कार्डचे त्वरित वितरण करा, अन्यथा जनतेच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरू , असा गर्भित इशारा सरकारला दिला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबईतील वीरेंद्र लगाडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. ऐरोली मतदार संघातील वंचितचे पदाधिकारी गजानन कांबळे यांच्या पुढाकाराने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई नेरुळ येथे पहिली जमीन हक्क परिषद यशस्वी झाल्यानंतर घणसोली येथे दुसरी परिषद झाली.

जमीन हक्क अर्थात प्रॉपर्टी कार्ड हा फक्त मागासवर्गीयांचा प्रश्न असल्याचे प्रस्थापित राजकारणी भासवत आहेत. मात्र नवी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना आपण ज्या सोसायटीत राहतो ती जमीन आपल्या मालकीची नसल्याची कल्पना देखील नाही , अशा ९० टक्के सोसायटया आणि ७० टक्के मूळ गावठाण असल्याचे राजाराम
पाटील यांनी नमूद केले.

वंचितांना न्याय मिळेपर्यंत जमीन हक्क आंदोलन नवी मुंबईत सुरु ठेवणार , असे वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबईतील वीरेंद्र लगाडे यांनी यावेळी नमूद केले.

कोकण दर्पण.

कोकण दारपण.