Press "Enter" to skip to content

पुरग्रस्तांच्या मदतीला धावले खारघर फोरम ! राजापूरवाडी गाव घेतले दत्तक !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या धुव्वाधार पावसाच्या प्रलयाने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मोठा तडाका बसला. गावच्या गाव वाताहत झाली. पावसाने अनेकांचे बळी घेतले. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले. खारघर मधील खारघर फोरम हि सामाजिक संस्था देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आहे. जीवनावश्यक वस्तू भरलेले तीन ट्रक घेऊन खारघर फोरमची टीम कोल्हापूच्या दिशेने रवाना झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पुरबाधित राजापूरवाडी गाव खारघर फोरमने दत्तक घेतले आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी खारघर फोरमने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन खारघरवासियांनी जवळजवळ *तीन ट्रक सामान* दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सामान जमा झाल्यामुळे ते *पोहोच करण्याची जबाबदारी स्वतः पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, चंद्रकांत पाटील, मनोज सोमवंशी , नगरसेविका लीना गरड व ५० फोरम टीम मेंबर्स* यांनी घेतलेली.

कोल्हापूर जिल्ह्याचा महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्याशी चर्चा करून *कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूर वाडी या कोल्हापूरपासून खूप रिमोट असलेल्या व शंभर टक्के पाण्याने वेढलेल्या ग्रामीण गावाची निवड* केली.  जणू काही ते गाव दत्तक घेतले आहे . सदरचे गाव *शंभर टक्के पाण्यामध्ये बुडालेले* होते. त्यामुळे गावातील पाणी ओसरल्यानंतर तात्काळ खारघर फोरमची टीम सामान घेऊन त्या ठिकाणी पोहचली. जमा झालेले साहित्य हे आपण कोणाच्याही मध्यस्थीशिवाय प्रत्येक *घरामध्ये जाऊन, घराला आवश्यक असणारे साहित्य खारघर फोरमच्या टीमने वाटप केले.

त्याचबरोबर खारघर फोरमच्या या गावांमध्ये डॉक्टर व इतर तज्ज्ञांच्यासह औषध आणि *मेडिकल कॅम्प* लावणार असल्याचे खारघर फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी सांगितले. तसेच पुरामुळे आणि जणांवरे मेल्यामुळे दुर्गंधी पसरून रोगराईचा धोका असल्यामुळे, *सॅनिटेशनचा २ टीम* घेऊन जाऊन ब्लिचिंग पावडर फवारणी व फुमिगेशनही संपूर्ण गावाची करणार आहोत. जवळपासच्या भागामधून पोकलयान किंवा जेसीबी भाड्याने मिळाल्यास, त्यांच्या साह्याने *मेलेली जनावरे जमिनीत पुरण्याचा प्रयत्न* करणार आहोत .पावसाच्या पुरामुळे *पाणी पुरवठाची व्यवस्था तसेच लाईटची व्यवस्था खराब* झालेले असेल, त्या टिमही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांनी दिली.

कोकण दर्पण.