Press "Enter" to skip to content

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा !

नवी मुंबई ,कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई रिपब्लिकन सेना आणि घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने कोपरखैरणे येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी साजरा करण्यात आली .

टाटानगर बेलापूर,व रामजीनगर कोपरखेरणे सेक्टर १२ नवी मुंबई येथे साहित्येरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली. रामजीनगर येथे संतोष नरवडे,जाधव,पटेलमॅडम,व टाटानगर सि बी डी बेलापूर येथे सुन्नदाताई , पूर्णिमा कवाडे ,लक्षीमान,कृष्णा ,जव्हरे,यांनी अतिश्रम केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते वीरेंद्र लगाडे , रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष खाजामिया पटेल घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हिरामणदादा पगार ,अशोक सुर्यवंशी ,कैलास सरकटे , नंदकुमार भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण दर्पण .