खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकाच्या वतीने महिला व बाल कल्याण विकास समिति व आरोग्य विभाग अंतर्गत ‘एक पाऊल कॅन्सर मुक्तीसाठी` महिलांना होणाऱ्या कॅन्सर विषयी आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन दिवसीय कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल, कळंबोली कामोठे व खारघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सदर शिबीर आयोजित केल्याची माहिती पनवेल महानगरपालिका महिला व बाल कल्याण समिती सभापती लीना गरड यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली . यावेळी प्रसंगी महापौर डॉ कविता चौतमाल , आयुक्त गणेश देशमुख , वर्षाताई ठाकुर, अर्चना ताई ठाकुर , स्त्री रोग तज्ञ डॉ मनीषा मटकर , डॉ शुभदा नील , प न पा अधिकारी गलांडे व सर्व नगरसेविका, डॉक्टर टीम व महिला कर्मचारी उपस्तिथ होते.
कोकण दर्पण.





