मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीस ओबीसी-भटके विमुक्त जाती मंत्री नामदार संजय कुटे , भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर, प्रदेश प्रभारी गुजरात शंकर चौधरी प्रदेश व माजी मंत्री गुंजन प्रजापती उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पदाधिकारी, प्रदेश कार्यकारणी सदस्य , जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस ,मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस, विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण दर्पण





