खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने बेलपाडा – खारघर येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय सुरज स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमल यांच्या शुभहस्ते आणि पनवेल मनपाचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी सभापती अभिमन्यू पाटील , भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका अनिता पाटील , सरचिटणीस दीपक शिंदे , गीता चौधरी , मोना अडवाणी, वासुदेव पाटील, सोशल विंगचे अध्यक्ष गुरनाथ म्हात्रे , राजेंद्र मांजरेकर , संतोष शर्मा, प्रभाकर घरत, अजय माली, आयोजक तथा नगरसेवक शत्रुघन काकडे , रवींद्र काकडे उपस्थित होते.
सदर क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कोकण दर्पण.