Press "Enter" to skip to content

गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयात प्रजासत्ताकदिन साजरा !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : दारावे येथील गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ७० वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गुरुवर्य बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुनील पाटील, पोलीस अधिउकरी , मुख्याध्यपक अविनाश पवार , पालक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समता , स्वातंत्र्यता , बंधुता आणि न्याय दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला दिलेले हेच प्रजासत्ताकराज्य आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपणावर आहे, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुनील पाटील यांनी यावेळी केले.

कोकण दर्पण.