पुणे , कोकण दर्पण वृत्तसेवा : पुणे येथील समता शिक्षण संस्था संचलित भागाबाई आ.वाघ प्राथमिक आश्रम शाळा आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (प्र.ल.) ता.जि.धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी २०१९ रोजी “प्रजासत्ताक दिवस” साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश जावळे व प्रमुख पाहुणे म्हणून विनोद शहारे उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते “ध्वजारोहण” करण्यात आले. कार्यक्रमास समता शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्रा.विलास वाघ ,माजी पोलिस पाटील मा.सिताराम वाघ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भाईदास पवार,महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डाँ. जालिंदर अडसुळे ,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील ,संस्थेचे समन्वयक मा.बुधा बि-हाडे,गावकरी लोक,शाळेचे शिक्षक वर्ग, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग तसेच पालक व विद्यार्थी उपस्थीत होते.
कोकण दर्पण .