नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात येणारे भव्य दिव्य आणि अविस्मरणीय T20 क्रिकेट चे सामने डॉ. विजय पाटील, अध्यक्ष, डी. वाय. पाटील समुह, यांच्या नेतृत्वाखाली यंदाही आयोजित करण्यात आले आहेत. दिनांक २१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या क्रिकेट उत्सवात भारतीय क्रिकेट चे अनेक नामवंत खेळाडू भाग घेणार आहेत.
युवराज सिंग, श्रेयस अय्यर, मनदीप सिंग, रॉबिन उत्तप्पा, उन्मुक्त चंद, सरफाराझ खान, नितीश राणा, शिवम मवी, नमन ओझा, दीपक हुडा, अर्जुन तेंडुलकर, प्रवीण तांबे हे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय तसेच आय.पी.एल. क्रिकेटपटू विविध संघांमधून खेळले आहेत. डॉ. डी.वाय. पाटील T20 क्रिकेट अंतर्गत खेळणाऱ्या डी. वाय. पाटील A , डी वाय पाटील B, रिलायन्स, एअर इंडिया, इंडियन ऑइल, ओ एन जी सी, बी पी सी एल, जैन इररिगेशन, आर बी आय, सी ए जी, सेंट्रल रेल्वे, वेस्ट्रेन रेल्वे, विजया बँक, कॅनरा बँक, फ्युचर ग्रुप, मुंबई कस्टम अश्या अनेक संघांचा समावेश आहे .
सर्व क्रिडा रसिकांसाठी पर्वणी असणाऱ्या या क्रिकेट उत्सवात प्रवेश मोफत असून, यांची उद्घाटन दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ११:०५ वाजता झाले आहे. जागतिक स्तरावर गाजलेल्या क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहून तुफान फटकेबाजीचा अस्वाद घ्यावा असे आवाहन विजय पाटील यांनी केले आहे. भव्य दिव्य अंतिम सामना डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजता प्रकाशझोतात खेळण्यात येणार आहे
कोकण दर्पण.