Press "Enter" to skip to content

नवी मुंबई- खारघर येथे सोलापूर महोत्सवाचे आयोजन ! सोलापूर सोशल फाउंडेशनचे आयोजन !

नवी मुंबई /पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने खारघर – नवी मुंबई येथे सोलापूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर येथील उत्सव चौक मैदानात १ ,२ आणि ३ फेब्रुवारी दरम्यान सोलापूर महोत्सव भरणार आहे. या महोत्सवामध्ये सोलापूर मधील व्यवसायाला , कलेला चालना देण्यात येणार आहे , अशी माहिती सोलापूर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.नवी मुंबई , पनवेल , खारघरवासियांनी सोलापूर महोत्सवाचा आनंद लुटावा , प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील यावेळी सुभाष देशमुख यांनी केले. यावेळी पनवेल मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती नगरसेविका लीना अर्जुन गरड, सामाजिक कार्यकर्ते तथा पोलीस अधिकारी अर्जुन गरड, शाश्वत फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जयेश गोगारी ,तसेच सोलापूर सोशल पाउंडेशनचे पधादिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा अध्यात्मिक , सांस्कृतिक , ऐतिहासिक , भौगोलिक , औध्यागीक बी कृषी विषयक विविधतेने समृद्ध असलेला राज्यातील प्रमुख जिल्हा आहे. या जिल्हयातील सोलापूर शहर , पंढरपूर , अक्कलकोट , मंगळवेढा , बार्शी , कर्माला व नीरा नृसिंहपूर इत्यादी आध्यत्मिक केंद्र प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्य काळात ४ हुतात्मे शाहीर अमर शेख , डॉ द्वारकानाथ कोटणीस , यांच्या योगदानामुळे जिल्यास ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सोलापूर शहरातील भिकोथ किल्ला , उजनी धारण , हत्तरसंगकुडल येथील नद्यांचा संगम , माळढोक पक्षी अभयारण्य हि ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहेत.
सोलापूर शहरातील कापड उद्याग जगप्रसिद्ध होत आहे. पंढरपूर येथील आषाढी बी कार्तिकी वारीमध्ये राज्यातील लाखो वारकरी सहभागी होतात. जिल्ह्यातील अनेक साहित्यिक , कलावंत , खेळाडू यांनी राष्ट्रीय स्तरावर लैकित मिळविला आहे. तसेच जिल्ह्यातील शेंगा , चटणी , शेंगपोळी , कडक भाकरी , ज्वारी , हुरडा , तूरडाळ हे खाद्य पदार्थ आणि डाळिंब , द्राक्षे , सीताफळ बी बेदाणा हि फळे प्रसिद्ध आहेत .
सोलापूर जिल्हा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात अग्रेसर रहावा , या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यासाठी जिल्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागातून सोलापूर सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून जिल्यातील विविध कृषी व औद्द्योगिक उत्पादने , आध्यत्मिक , सांस्कृतिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे , जिल्ह्यातील विशिष्ठ खाध्य संस्कृती तसेच जिल्ह्याच्या विविध प्रकारच्या कलाना वाव देण्यासाठी व त्यांना व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी १६ ते १८ नोव्हेम्बर २०१८ रोजी पुणे येथे सोलापूर फेस्टचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथील उत्तम प्रतिसादानंतर यावर्षी खारघर – नवी मुंबई येथे १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान सोलापूर फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात १०० स्टॉल्सद्वारे जिल्ह्यातील विविध उत्पादनाचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. २० स्टॉल्स हे खाद्य पदार्थांचे असणार आहेत.सोलापूर जिल्हातील लेखक व कवींनी लिहिलेल्या सुमारे २०० पुस्तकांचे , कविता संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सोलापूर जिल्यातील मूळ रहिवाशी असलेल्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचा श्रीमंती सोलापूरची हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.
महोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नवी मुंबईकर आणि पनवेलकरांना तसेच विशेषतः खारघरवासियांना लुटता येणार आहे. हास्यकल्लोळ , लोकगीतांचा कार्यक्रम, भारूड , आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आकर्षण राहणार आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनचे ब्रँड अँबेसॅटर प्रसिद्ध नाट्य व सिनेअभिनेता राहुल सोलापूरकर तिन्हीही दिवस उस्थित राहणार आहेत.

कोकण दर्पण.