Press "Enter" to skip to content

प्रजासत्ताक दिनी भाजपा कार्यालय खारघर येथे माजी सैनिकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : ७० व्या भारतीय प्रजासत्ताक दिनी भाजपा कार्यालय खारघर येथे माजी सैनिकांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनसंपर्क कार्यालय से. १३ खारघर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी सैनिक कर्नल राव, कॅप्टन श्रीमती किरण सिंह, कमांडर वेद प्रकाश यादव, जगदीश राज, पूर्णचंद, जगदीश शर्मा, विजय सिंग व मेजर एन.के.सिंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती अ सभापती अभिमन्यूशेठ पाटील,नगरसेविका अनिता पाटील,नेत्रा पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेशजी पटेल,तालुका उपाध्यक्ष संतोष शर्मा,तालुका चिटणीस वासुदेव पाटील,शहर सरचिटणीस दीपक शिंदे,गीता चौधरी,किरण पाटील, उपाध्यक्ष सुरेश ठाकूर,राजेन्द्र अग्रवाल,मोना अडवाणी, प्रभाग ४ अध्यक्ष प्रभाकर बांगर,भरत कोंढाळकर,विलास आळेकर,रामकुमार चौधरी,प्रतीक्षा कदम,आशा शेडगे,कुणाल संघांनी,कविता अग्रवाल,अशोक जंगीड,काशिनाथ घरत,विलास राठोड इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण.