Press "Enter" to skip to content

देशभक्तीपर समूह गीतांनी खारघर दुमदुमले ! प्रजासत्ताक दिनी शाश्वत फाउंडेशन आयोजित माझ्या देशा – भारत देशा कार्यक्रमाने खारघरवासियांची मने जिंकली !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : ७० व्या प्रजासत्ताक दिनानित्ताने शाश्वत फाउंडेशनने खारघर येथे आयोजित केलेल्या माझ्या देशा – भारत देशा या देशभक्तीपर समूह गीत कार्यक्रमाने खारघर दुमदुमले. शाश्वत फाउंडेशन आयोजित माझ्या देशा – भारत देशा कार्यक्रमाने खारघरवासियांची मने जिंकली.

शाश्वत फाउंडेशनच्या वतीने आणि अध्यक्षा बिना गोगरी यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर १२ शिल्प चौक जवळील उद्यानात रविवार दिनांक २७ जानेवारी रोजी सदर कार्यक्रम संपन्न झाला.
विधी जोशी संचलित स्वरतरंग या कार्यक्रमाद्वारे ४ ते ६० वयोगटातील ९६ कलाकार मराठी आणि हिंदी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य , समूह गीते सादर केली . खारघरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमासाठी भाजपा किसान मोर्चा युवा विभाग राष्ट्रीय सचिव संदिप देशमुख ,भाजपा पनवेल तालुका उपाध्यक्ष संतोष शर्मा, भाजपा तळोजा विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी ,ह्युमानिटी फर्स्ट फाऊंडेशनचे राष्ट्रीय सभापती डॉ. हेमंत मकवाणा, ऍड राजेन्द्र अग्रवाल,आर. के. दिवाकर, शावेज मोईनुद्दीन रीजवी, सुप्रसिद्ध हिंदी कवियत्री मीनू मदान, कोकण दर्पण वृत्तसमूहाचे संपादक संजय महाडिक , मनसे रायगड जिल्हा सरचिटणीस केसरीनाथ पाटील, रमेश महेन्दु, सुमित्रा चव्हाण, अंकिता वारंग , संतोषी चव्हाण, भावना माहेश्वरी, खारघर सरचिटणीस दीपक शिंदे , खारघर चिटणीस कुणाल संघानी ,आनंद ज्ञाने, वशिष्ठ यादव आदी मान्यवर उपस्थित होते. डी.एच.ट्रेडींग,ए प्लस ट्युटोरीयल, व्ही श्युअर लोजिस्टीक,अनोवा ग्लोबल,शावेज मोईनुद्दीन रिजवी यांनी कार्यक्रम आयोजनात विशेष सहभाग दिला.
विधी जोशी व प्राची जोशी ह्यांच्या सह एकूण ९६ गायकांच्या समूहाने कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मुळे यांनी केले.

कोकण दर्पण.