नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : सत्याग्रह महाविदयालय, नवी मुंबईच्यावतीने ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भव्यदिव्य संविधान सन्मान रॅलीचे खारघर, नवी मुंबईत संपन्न झाली. उत्सव चैक ते सुप्पारक भवन, खारघर मध्ये या रॅलीत डा. नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळा, सिध्दार्थ मल्टिपरपज् रेसिडेन्शल हायस्कूल, डा. जी. के. डोंगरगांवकर इन्टरनॅशनल स्कूल, अजिंठा इन्टरनॅशनल स्कूल, सत्याग्रह ज्युनिअर काॅलेज, सत्याग्रह महाविदयालय, सत्याग्रह अध्यापक महाविदयालय, सत्याग्रह कौषल्य प्रशिक्षण केंद्र, डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेतील 3 हजार पेक्षा जास्त विदयार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक या संविधान रॅलीत सहभागी झाले होते. खारघर मधील सर्व पक्षिय कार्यकर्ते मोठया उत्साहाने या रॅलीत सहभाग नोंदविला.
शिक्षक आमदार बाळाराम पाटील, भाजपा खारघर शहर अध्यक्ष, ब्रिजेश पटेल, एमएमआयचे नेते हाजी शाहनवाज खान, शेपचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राम करावकर, शेकाप खारघर शहर अध्यक्ष अशोक गिरमकर, भीमसंग्रामचे संपादक मुकेश शिंदे , कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक, शेकापचे नेते संतोष तांबोळी , शाश्वत फाऊंडेशनच्या अध्यक्षा बिना गोगरी, अमरचंद हाडोळतीकर, भारिप बहुजन महासंघाचे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते. मान्यवरांनी या रॅलीचे स्वागत डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून केले. आदी आंबेडकर आंदोलनाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष विरोचन यांनी शिल्प चौक येथे संविधान सन्मान रॅलीचे जोरदार स्वागत केले.
रॅलीत स्वातंन्न्याच्या चळवळीतील नेते, समाजसुधारक, संविधानकार यांच्या वेशभुषा केलेले विदयार्थी समावेशित झाले होते असे सुजाता भोसले यांनी सांगितले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभुषेतील विदयाथ्र्यांनी संविधानातील मुलभूत अधिकार आणि कर्तव्याचे फलक हाती घेतले होते. विशेषतः भारत माता की, जय ! संविधानाची कास धरू ! असमानता नष्ट करू !! डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ! सर्वांसाठी भारताचे संविधान !! प्रजासत्ताक दिनाचा विजय असो ! कर्तव्य, हक्काचे भान ! मिळवु देते संविधान !! संविधानाचे सुत्र ! स्वातंन्न्य, समता, बंधुत्व !! अशा हया विदयाथ्र्याच्या हातातील फलकावरील मजकुर स्त्याच्या दुतर्फी उभ्या राहिलेल्या नागरिकांचे विशेष लक्ष वेधत होते. शिल्प चैक पासुन रिलायंस माॅल हा रस्ता या रॅलीने व्यापला होता. संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक प्रतिज्ञा सत्याग्रह मैदानात बिना गोगरी, नगरसेविका नेत्रा पाटील, प्राचार्या वनिता सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत विदयाथ्र्यांनी घेतली. संविधान पाठशाळेच्यावतीने नवी मुंबईतील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्यांना डाॅ. टी. आर. घोबळे, प्रोफेसर तथा माजी इतिहास विभाग प्रमुख मुंबई विदयापीठ यांच्या हस्ते देण्यात आले. सत्याग्रह महाविदयालयाचे प्राचार्य डाॅ.जी. के. डोंगरगांवकर यांनी रॅलीच्या समारोपात बोलतांना म्हणाले, भारताचे संविधान घराच्या बाहेरील सर्व व्यवहाराचे नियंत्रण करणारा कायदा असुन नव भारताच्या उभारणीचा पाया संविधानाने रचला आहे- सर्व भारतीयांनी संविधानाचा ठेवा घरोघरी ठेवून त्याचा पारायण होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले- भारतीय संविधान निशुल्क सामाजिक कार्यकत्र्यांना संविधान साक्षरतेसाठी २००६ पासुन दिले जात असून इच्छुकांनी संविधानासाठी मागणी करावी असे त्यांनी जाहीर केले. रॅलीची यशस्वी करण्यासाठी सुजाता भोसले, डाॅ अलका कलशी, प्रा. ललिता यशवंते, सिंधु कोनेटी, प्रा. प्रज्ञा खोपकर, प्रियांका पाटील, आशा शिंदे, निलेश मुकादम यांनी केले असे प्राचार्या वनिता तोरणे यांनी सांगितले.
कोकण दर्पण.