खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : पंजाबी कल्चरल एसोसिएशनच्या वतीने खारघर येथे लोहडी कि रात हा उत्सव मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पंजाबी संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
टीव्ही अँकर रतन आणि वीरेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाची शान वाढविली. कार्यक्रमाला पनवेल मनपाचे विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी , खारघर शार अध्यक्ष अशोक गिरमकर, माजी उपसरपंच संजय घरत, गणेश कडू , खारघर शार अध्यक्ष अशोक गिरमकर , अमित भतीजा, जसविंदर सिंह, अखिलेश पांडे, कमल शर्मा, पंजाबी कल्चरल एसोसिएशन बेलापूर अजीत सिंह रंधावा, रविंद्र सेतिया आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या संस्थापिका कीर्ति मेहरा, अध्यक्ष विरेंद्र अरोड़ा यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार मानले.
कोकण दर्पण.