Press "Enter" to skip to content

माझ्या देशा – भारत देशा कार्यक्रमाचे आयोजन ! प्रजासत्ताक दिनानित्ताने शाश्वत फाउंडेशनच्या वतीने आयोजन !

खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : ७० व्या प्रजासत्ताक दिनानित्ताने खारघर येथे माझ्या देशा – भारत देशा या देशभक्तीपर समूहगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत फाउंडेशनच्या वतीने आणि अध्यक्षा बिना गोगरी यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर १२ शिल्प चौक जवळील उद्यानात रविवार दिनांक २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच ते साडेसात या वेळात सदर कार्यक्रम होणार आहे.
विधी जोशी संचलित स्वरतरंग या कार्यक्रमाद्वारे ४ ते ६० वयोगटातील ७० कलाकार मराठी आणि हिंदी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य सादर करणार आहेत. सर्व खारघरवासीयांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येणार आहे. खारघरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटावा , असे आवाहन शाश्वत फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जयेश गोगरी यांनी केले आहे.

कोकण दर्पण.