Press "Enter" to skip to content

स्पर्धा पुरस्कारांच्या माध्यमातून सामान्य माणसांची विकास-आनंदयात्रा सुरूच !

आपल्या महत्वाकांक्षी जीवनात सगळ्यांनाच विविध आव्हनांना सामोरे लागतेच तरी सुद्धा हे जीवन आनंद देणारे आहे ह्यावर आपल्या सगळ्यांचाच विश्वास आहे आणि म्हणूनच रोज नवीन आनंद शोधण्याचा प्रयत्न आपण आपल्या परीने करीत असतो, मग ते गायन-नृत्य असो कि अजून काहीही असो, प्रत्येकाची आनंदाची जडण-घडण वेगळी आहे.

असाच आनंदाचा सोहळा नवी मुंबई प्रेस क्लब, द ट्रेडिशन व सोसायटी किंगडम हे एंजोय मुव्हमेंट च्या माध्यमातून साकारीत आहेत. अशा ह्या अद्वितीय भगीरथ प्रयत्नांना आपल्या श्रद्धेची, आपुलकीची आणि सहकार्याच्या अपेक्षा आहे. आज एंजोय मुव्हमेंट, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात कला-गुणांचा वारसा निर्माण करीत आहेत. त्याचबरोबर स्वच्छता, निसर्ग संवर्धन, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, क्रीडा आणि विकासाच्या नवीन पायघड्या नवी मुंबई प्रेस क्लब, द ट्रेडिशन व सोसायटी किंगडम उलघडताना दिसत आहेत. सोसायटी सुशोभीकरण-स्वच्छता-संवर्धन पुरस्कार स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फॅशन आणि फिल्म फेस्टिवल त्याचबरोबर अशा अनेक स्पर्धांचे आयोजन होत आहे.

पखवाज-तबला स्पर्धेचे परीक्षण जगविख्यात पखवाज गुरु पं. भवानी शंकर जी करणार आहेत आणि रिथम – इन द सर्च ऑफ साऊंड स्पर्धेचे परीक्षण जगविख्यात ढोलकी वादक श्री. विजय चव्हाण जी करणार आहेत.

स्पर्धेच्या नोंदणीची अंतिम दिनांक दिनांक ३१जानेवारी २०१९ आहे.

इच्छुक सोसायटीज, कलाकार-नवोदित कलाकारांनी त्वरित खाली दिलेल्या क्रमांक/वेबसाईट/मोबाईल अँपवर संपर्क साधावा.
मोबाईल क्रमांक – 9319864411, व्हॅट्सऍप क्रमांक – 9221281332
वेबसाईट : www.societykingdom.com
Android App : Society किंग्डम

कोकण दर्पण.