नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तपत्रसेवा : सत्याग्रह महाविद्यालय नवी मुंबईच्यावतीने ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन शनिवार, दिनांक २६ जानेवारी २०१९ , सकाळी ७ वाजता खारघर, नवी मुंबईच्या उत्सव चैक, शिवाजी चैक, शिल्पचैक, सुप्पारक भवन मार्गे करण्यात आले आहे. या रॅलीत डाॅ. नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळा, सिध्दार्थ मल्टिपरपज् रेसिडेन्शल हायस्कूल, डाॅ.जी.के. डोंगरगांवकर इन्टरनॅशनल स्कूल, अजिंठा इन्टरनॅशनल स्कूल, सत्याग्रह ज्युनिअर काॅलेज, सत्याग्रह महाविदयालय, सत्याग्रह अध्यापक महाविदयालय, सत्याग्रह कौषल्य प्रशिक्षण केंद्र, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेतील विदयार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तमाम नागरिकांना या संविधान रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रषांत ठाकुर यांना या रॅलीच्या उद्घाटनासाठी तर समारोपाला शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांना पाचारण करण्यात आले आहे असे संयोजक सुजाता भोसले, प्राचार्य वनिता सुर्यवंशी, डाॅ. अलका कलशी, प्रा. ललिता यशवंते, सिंधु कोनेटी, प्रा. प्रज्ञा खोपकर, प्रियांका पाटील, आषा शिंदे, निलेश मुकादम यांनी सांगितले. गेली १० वर्षापासून या रॅलीचे आयोजन या संस्थेच्यावतीने भारतीय संविधानाचे जागर व्हावा या उद्देशाने केला जातो असे डाॅ. निधी अग्रवाल, प्रा. जान्हवी साल्पेकर या म्हणाल्या. प्रजासत्ताक दिनी दुपारी 03.00 वाजता शांताबाई रामराव सभागृह, सत्याग्रह महाविदयालय, खारघर पोलीस स्टेशनजवळ, सेक्टर ७ , खारघर, नवी मुंबई येथे माजी न्यायमुर्ती डाॅ. यशवंत चावरे, डाॅ. जयश्री कवठेकर, डाॅ. प्रज्ञा डोंगरगांवकर यांच्या हस्ते नवी मुंबईतील महिला, युवक, सामाजिक व कामगार चळवळीतील कार्यकर्ते आणि सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे संचालक, शाळा महाविदयालय व राजकीय पक्षाच्या कार्यकत्र्यांना भारताचे संविधान निशुल्क वितरीत करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्ष प्रा. डाॅ.जी.के. डोंगरगांवकर असून विशेष अतिथी म्हणून नेते जगदिश गायकवाड, अभिमन्यु पाटील, नगरसेवक गुरूनाथ गायकर, पनवेल महानगरपालिका यांना निमंत्रीत करण्यात आले आहे असे मुख्याध्यापिका सुजाता भोसले यांनी कळविले आहे.
कोकण दर्पण