कोकणाचे मुखपत्र म्हणून कोकण दर्पण हे वृत्तपत्र काम करीत आहे. कोकण दर्पणला वाढविण्यासाठी संपादक संजय महाडिक यांचे सततचे प्रयत्न मी पाहत आहे. कोकण दर्पण हे संपूर्ण महाराष्ट्रात पसरावे हि शुभेच्छा !
मा . लोकनेते रामशेठ ठाकूर
माजी खासदार
एक धडपड्या पत्रकार म्हणून मी संजयला पाहते. कोकण दर्पण सुरु करून त्याने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. एक उत्तम लेखक म्हणून त्याच्याकडे पाहते. कोकण दर्पण हे वर्तमानपत्र वाढविण्यासाठी संजयची सततची धडपड , सततचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील , त्यासाठी खूप शुभेच्छा !
मा. आमदार मंदाताई म्हात्रे
बेलापूर विधानसभा
—————————————————————————————————————————————–
कोकण हि महाराष्ट्राची शान आहे. कोकण दर्पण हे कोकणच्या भूमीचे मुखपत्र आहे. समाजाच्या विकासाठी , शासनाच्या विविध योजना खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कोकण दर्पण नक्कीच काम करेल असा विश्वास व्यक्त करतो. खारघर येथून प्रसिद्ध होत असल्याने पनवेल महानगराच्या विकासात , इथल्या विकासाला चालना देण्यासाठी कोकण दर्पणने काम करावे. हि सदिच्छा व्यक्त करतो .
आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल विधानसभा
संजय महाडिक एक लढवय्या पत्रकार आहेत. मागील अनेक वर्ष ते पत्रकारिता करीत आहे. कोकण दर्पण हे स्वतःचे वृत्तपत्र सुरु करून त्यांनी मोठी जोखीम उचलली कारण वर्तमान पत्र चालविणे सोपी गोष्ट नाही. त्यांचे लेखन उत्तम आहे. कोकणाचा चेहरा कोकण दर्पण मध्ये दिसला पाहिजे . कोकणच्या विकासासाठी पत्रकारिता करावी , हि शुभेच्छा !
आमदार बाळाराम पाटील
फुले , शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे कोकण दर्पण हे वर्तमान पत्र आहे. नेहमीच सत्याची कास धरून समाज मनाचा आरसा म्हणून सिद्ध झाले आहे. संविधानिक लोकशाहीचा वारसा जपणारे हे वर्तमान पत्र आहे . या वर्तमान पत्राने सदैव सत्याची बाजू धरावी , हीच शुभेच्छा !
जे एम म्हात्रे
माजी नगराध्यक्ष
पनवेल
एक झुंजार पत्रकार म्हणून संजय महाडिक संपूर्ण कोकणात काम करीत आहेत. कोकणच्या विकासाठी , कोकणाचे प्रतिबिंब म्हणून , कोकणाचा आरसा म्हणून कोकण दर्पणने काम करावे , अशी अपेक्षा आणि शुभेच्छा !
शिरीष घरत , शिवसेना
रायगड जिल्हाप्रमुख
—————————————————————————————————————————————–
कोकण दर्पण हे वर्तमानपत्र आंबेडकरी पत्रकारीतेला पुरस्कारात करणारे वृत्तपत्र आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील वंचितांचे मुखपत्र बनावे असे वाटते . आज संविधानिक लोकशाही धोक्यात असल्याचे जाणवते, धर्माचे ठेकेदार हे संविधानावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करतात . देशाच्या एकतेला हे आव्हान आहे , याबाबत कोका दर्पणने लोकशाही , संविधान याबाबत मूतव सांगणारी जनजागृती करावी , लोकशाहीचे रक्षण करावे , हि शुभेच्छा !
शाहनवाज खान
एमआयएम नेते
—————————————————————————————————————————————–
पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून आम्ही संजय महाडिक यांच्याकडे पाहतो. त्यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल्स मध्ये कामे केली. त्याअनुभवातून त्यांनी कोकण दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले. त्यांच्या जिद्दीचे , सातत्याचे नक्कीच कौतुक करावे वाटते . कोकण दर्पणच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
ब्रिजेश पटेल , अध्यक्ष
भाजपा खारघर शहर
—————————————————————————————————————————————–
कोकण दर्पणच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त अनेक मान्यवरांकडून शुभेच्छाचा वर्षाव ! लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, एमआयएम नेते शाहनवाज खान आदींनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
आमचे मार्गदर्शक,पत्रकार, संपादक मित्र संजयजी महाडिक, सर्वप्रथम आपणास साप्ताहिक कोकण दर्पणच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आपले कौतुक व अभिनंदन. खारघर भाजपातर्फे १६ ऑक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने खारघरमधील अनेक प्रतिभावंत पत्रकारांचा आम्ही सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रत्येक पत्रकारांचे वेगळेपण प्रकर्षाने दिसून आले. जेव्हा आपल्या बद्दल माहिती मिळाली आणि थक्क झालो. कोकणातील छोटय़ाश्या गावातून स्वप्ननगरी मुंबईतील आपला प्रवास,प्रामाणिक धडपड, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन आपण व आपल्या साप्ताहिक कोकण दर्पणचा प्रवास आश्चर्यचकित करणारा आहे. महाविद्यालयीन वयापासून आपण एक चळवळी व्यक्तिमत्त्व. महाविद्यालयीन जीवनात आपले शैक्षणिक क्षेत्रातील कार्य,युवकांचे नेतृत्व,आपले वक्तृत्व, संघटनकौशल्य, खेळाडूवृत्ती या आपल्या अष्टपैलू गुणांमुळे आपण अल्पावधीत प्रसिद्धीत आला आणि कॉलेजचे जनरल सेक्रेटरी म्हणून आपली निवड झाली.
१९९७पासून शिक्षण घेत असता आपण पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहात. केसरी,पुढारी,सकाळ, आपलं महानगर,मुंबई लक्षद्विप, नवशक्ती, कृषीवल सारख्या मोठमोठ्या वृत्तपत्र समूहांसाठी आपण कार्य केलेत. चूप बैठना ये आपके फितरत में नहीं. उत्तुंग स्वप्न, यशस्वी होणे उत्तम पत्रकार होऊन लेखणीच्या माध्यमातूनसमाजाला न्याय मिळवून देणे.स्वातंत्र्य,समता व बंधुता या डॉ. आंबेडकर व छ. शिवाजी महाराजांछ विचारांशी समरस असलेले आपले व्यक्तिमत्त्व. त्या विचारधारेतून आपण साप्ताहिक कोकण दर्पणचे स्वप्न पाहिले,स्वतःची वेगळी ओळख पटवून देण्यासाठी आपल्यासाठी हे उत्तम व्यासपीठ मिळाले. सन२०१1साली लावलेले हे छोटे रोपटे आज चांगलेच तग धरून उभे आहे.या वाटचालीत कोकण दर्पण व वाचक यांच्या अतूट नाते निर्माण झाले.वाचनीय बातम्या, क्रीडा,राजकारण,समाजकारण,प्रबोधन,चालू घडामोडी या सर्वांविषयी आपले लेखन वाचकांच्या पसंतीला उतरले आहे.भ्रष्टाचार व अन्याय याविरुद्ध आपली लेखणी तलवारीसारखी कार्य करीत असते तसेच केलेल्या चांगल्या कामासाठी कोकण दर्पणच्या माध्यमातून कौतुकाची थाप सुद्धा मिळते. संजयजी आपल्यातील बेधडक झुंजार,ध्येयवादी,सडेतोड,निर्भीड पत्रकारितेला सलाम.
कोकण दर्पण साप्ताहिकाचा वर्तमानपत्रात रूपांतर झालेले पाहावयास आवडेल. ते लवकरच पूर्ण होवो.आपल्या लेखणीला धार मिळो व आपल्या लेखनातून समाजकार्य घडो ही सदभावना..
पुनश्च अभिनंदन व कौतुक
आपला
दीपक शिंदे, सरचिटणीस
खारघर शहर, भाजपा
—————————————————————————————————————————————–
अभिनंदन आणि पुढिल वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा. . .सलाम आपल्याला व पत्रकारितेला.वेळेला सुट्टि नसते,स्वप्नांना अंत वेळ नसते व जिवनाला काही विरामकळ नसते.कोकणातील दुर्गम खेड्यातून मुंबईत तेहि खारघर सारख्या नवख्या व पुर्व चेहरा नसलेल्या,पण भारताच्या अनेक ठिकाणांची,वेगवेगळ्या प्रांतातील,जिल्हा तालुक्यातील माणसे नोकरी व्यवसायासाठि एकत्र रहायला आल्याने अखिल भारतीय संस्कृतीचा नवा चेहरा लाभलेल्या शहरात सतत अव्याहतपणे मराठी भाषेत “कोकण दर्पण”चालवणे फारच जिकरीचे व जिद्दीचे काम आहे.त्यायोगे राजकारणावरील वृतपत्र चालविण्या बरोबरच समाज उन्नतीचे कार्यक्रम यथाशक्ति राबविणे हे अधिक काैत्युकास्पदच.आपली तशी फार जवळीक नाहि पण आपली धडपड मि जवळून पहात आलोय कदाचित कोकण हा आपल्यातील भावनिक दुवा असू शकेलही.पण आपली पत्रकारीतेतील सर्वसमावेशक व पत्रकारास आवश्यक असलेली निरक्षिर द्दष्टि हे हि एक सबळ कारण असू शकेल की,त्यामुळे आपले काैत्युक करावे असे मनाने सुचविले असेल.व्यववसाया बरोबरच त्यातील अद्दष्य पण अधोरेखीत मूल्ये जपत आपण यापुढेही मोठे वृत्तपत्र,वृत्तपत्रसमुह तसेच मिडिया वाहिनी सुरु करावी व उत्तरोत्तर आपली प्रगती होवो हि या आपल्या”कोकण दर्पण”च्या नवव्या वार्षिक पदार्पणाला ईश्वर चरणी प्रार्थना. .
श्री.दिलिप सिताराम जाधव. उपाध्यक्ष
भारतीय जनता पार्टि,खारघर शहर.
—————————————————————————————————————————————–
कोणत्याही राजकीय पक्षाचा कल न घेता सत्य आहे तेच लेखणीद्वारे प्रकट करणे,हे संपादक संजय महाडिक व कोकण दर्पणचे खासियत आहे. ८ व्या वर्धापन दिनाचा अनंत शुभेच्छा.
अभिमन्यू पाटील
सभापती , पनवेल मनपा
—————————————————————————————————————————————–
सुंदर छपाई,आकर्षक मांडणी, स्वतःचे वेगळेपण,नवनवीन प्रयोग हे कोकण दर्पणच्या माध्यमातून सतत पहावयास मिळते. प्रयोगशील व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारे संपादक संजयजी आपले अभिनंदन.
आपणास व साप्ताहीक कोकण दर्पण उत्तरोत्तर अशीच प्रगती पता राहो ही सदिच्छा.
निलेश बाविस्कर
माजी सभापती , नगरसेवक
पनवेल मनपा
—————————————————————————————————————————————–
सन्मानीय संपादक संजय महाडिक साहेब,
आपण घेतलेल्या खडतर प्रयत्नाला मिळत असलेले यश पाहून आपला अभिमान वाटतो. आपले साप्ताहिक आज वाचकांच्या मनात घर करून राहिली आहे.वेचक व बेधडक बातम्या या नेहमीच आपलेसे करतात.
आपल्या पत्रकारितेला सलाम वर्धापन दिनाचा लक्ष लक्ष शुभेच्छा.
बिना गोगरी
सरचिटणीस भाजप महिला मोर्चा खारघर
अध्यक्षा शाश्वत फाउंडेशन
—————————————————————————————————————————————-
राजकीय व सामाजिक तसेच स्थानिक बातम्या यामुळे आपल्या विभागातील खरीखुरी बातमी जन माणसांपर्यंत आपण पोहोचवीत असता. मुद्देसूद व वाचनीय बातम्या,प्रबोधनपर लेखनयामुळे दर आठवड्याला आम्ही कोकण दर्पणची वाट पाहत असतो. संपादक संजय महाडिक साहेब व साप्ताहीक कोकण दर्पण आपणास मनपूर्वक
नरेश ठाकूर
नगरसेवक पनवेल मनपा
—————————————————————————————————————————————–
संविधानाबद्दल आस्था असणारे, पत्रकारितेच्या माध्यमातून बाबासाहेबांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व देशाच्या राजकीय बातम्या आपल्या कोकण दर्पणच्या माध्यमातून पोचवीत असतात.
त्यामुळे समाजाचे प्रबोधन घडत असते.आपली पत्रकारिता व लेखनाचे वैशिष्ट पूर्णता नेहमीच भावते.साप्ताहिक कोकण दर्पणचा ९व्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा.
अशोक गिरमकर
अध्यक्ष शेकाप खारघर
—————————————————————————————————————————————–
पत्रकार संजय महाडिक हे मागील २४ वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत. कोकण दर्पणच्या माध्यमातून एक सामाजिक चळवळ उभी करण्याची त्यांची धडपड दिसते. एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
गुरुनाथ पाटील , शिवसेना
माजी खारघर शहर प्रमुख
वर्तमानपत्रे हे समाज जीवनाचा आरसा असतात. कोकण दर्पण साप्ताहिकांच्या माध्यमातून अनेक समस्या प्रतिबिंबित होत असतात.नवनवीन प्रयोग व सातत्यपूर्ण लेखन हे कोकण दर्पणची वैशिष्टे.
वर्धापन दिनाच्या अनंत शुभेच्छा
प्रसाद परब
अध्यक्ष मनसे खारघर शहर
कोकणच्या मातीत जन्मलेला संजय महाडिक हा हाडाचा पत्रकार आहे. मागील अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता करीत आहे .कोकण २६ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी कोकण दर्पण हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. हे पत्रक उभे करताना ते प्रामाणिकपणे धडपडत आहेत , त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येवो हि सदिच्छा !
रामदास नारकर
उपाध्यक्ष
पनवेल तालुका काँग्रेस
सामाजिक उपक्रमांना चांगली प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देणारे कोकण दर्पण हे वृत्तपत्र आहे. समाजाच्या मनात सदैव स्थान करून ठेवण्याची संपादक संजय महाडिक यांची धडपड असते. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना मनपूर्वक शुभेच्छा !
जयेश गोगरी
कार्याध्यक्ष , शाश्वत फाउंडेशन
समाज मनाचा आरसा म्हणून कोकण दर्पणने काम करावेच , पण जिथे अन्याय होतोय तिथे आक्रमकपणे आपली लेखणी चालवावी.पुढील वाटचालीस शुभेच्छा !
शंकर ठाकूर
शिवसेना , खारघर शहर अध्यक्ष .
———————————————————————————————————————