Press "Enter" to skip to content

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवीमुंबईमध्ये विविध कार्यक्रम संपन्न ! एमआयएम नेते शाहनवाज खान यांच्या पुढाकाराने उभारली माणुसकीची भिंत ! जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्र वाचनालय !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका केंद्रित करून एमआयएम पक्षाने नवीमुंबई शहरात विविध कार्यक्रमाचा धडाका लावला आहे. तुर्भे परिसरात येथील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरु करण्यात आले आहे. आपले टाकाऊ कपडे गोरगरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वाभिमानाची भिंत – माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. यावेळी २०१९ नवीन वारशाचे कॅलेंडरचे प्रकाशन देखील करण्यात आले . एमआयएमचे नेते हाजी शाहनवाज खान यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भारिपचे नेते ऍड.हणमंत वाक्षे, एमआयएमचे नवी मुंबई नेते हरमीत सिंग, साजिद खान, साजिद शेख, कलीम शेख, एमआयएम आणि भारिपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणुसकी हाच खरा धर्म आहे. माणुसकी धर्माला जागलो तर अखंड मानवतेचे कल्याण होईल , सामान्य गरीब माणसाला मदत होईल, या भावनेतून माणुसकीची भिंत उभारण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम घेतल्याचे शाहनवाज खान यांनी सांगितले.

यावेळी वेगळी संकल्पना घेऊन जनमाणसात एकत्र होऊन पक्ष संघटन करण्यासाठी एमआयएम आणि भारीपने कंबर कसली आहे. वेगवेगळे विषय घेऊन हाजी शाहनवाज खान नवी मुंबईमध्ये जनतेच्या समोर येताना दिसून येत आहते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसह विधानसभा निवडणुकांसाठी नवी मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणीला खान यांनी भक्कम सुरुवात केली आहे. नवीमुंबईमधील तुर्भे याठिकाणी आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, यावेळी परिसरातील लहान मुलांपासून ते जेष्टांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत पोहोचून ज्यांचे टाकाऊ सामान हे गोगरिबांच्या कामी येणारे असे. मात्र आपण यामध्ये एक दुवा होऊन काम केले पाहिजे जेणे करून श्रीमंतांच्या घरातील अडगळ दूर केल्याने व गोरगरिबांना त्यांना उपयोगात येणारे मिळाल्याने सर्व वर्गातील जनता तुमच्यावर खुश होऊन जाईल. या बाबींचा कार्यकर्त्यांनी विचार करून कामाला लागणे गरजेचे असल्याचेही यावेळी शाहनवाज खान यांनी उपस्थितांना सांगितले.

कोकण दर्पण.