संजय महाडिक :
महाराष्ट्राच्या राजकारणातील संवेदनशील नेतृत्व, कर्तव्य आणि कर्तृत्व म्हणजे नवी मुंबईचे खंबीर नेतृत्व ,बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे होय. एक सामान्य कार्यकर्त्या ते राज्यातील कार्यसम्राट आमदार हा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत संघर्षाचा असला तरी नवीन पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासावर भाष्य करणारा कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक यांनी भाष्य केलेला हा थोडक्यात आलेख…
एक यशस्वी राजकारणी होण्यासाठी पहिल्यांदा एक चांगला माणूस , समाजाची जाणीव असलेली एक चांगली व्यक्ती व्हावे लागते. एक प्रामाणिक समाजकारणीच उत्तम राजकारणी होऊ शकतो. मंदाताकडे हि सगळी वैशिष्ठे पहायला मिळतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात संयम आहे. अपार कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव आणि सामाजिक संवेदना अपार आहे. माणसे जोडण्याचे मोठे कसब त्यांच्यात आहे, खरतर हे एखाद्या व्यक्तिमत्वाला नैसर्गिकरित्या मिळाले वरदान म्हणता येईल. ताईकडे कोणतीही व्यक्ती एखादे काम घेऊन आली तर त्या व्यक्तीचे काम कसे होईल याकडे मंदाताईंचे लक्ष असते. मंदाताईंच्या व्यक्तिमत्वात संवेदना आहे आणि त्या संवेदनेत कठोर प्रशासक देखील आहे. शासन प्रशासन स्तरावर एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा , ते काम मार्गी कसे लावावे , हे कौशल्य त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे.
नवी मुंबई महानगरातील सीबीडी बेलापूर विभागातून समाजसेविका म्हणून सामाजिक कार्यात मंदाताईंनी सुरुवात केली. पुढे राजकारणात प्रवेश झाला. एक गृहिणी , एक समाजसेविका नवी मुंबई महानगराची नगरसेविका बनली. हा प्रभाव फक्त कार्याचा होता आणि जनतेने मंदाताईंवर ठेवलेल्या विश्वासाचा होता. केला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचा प्रभाव आणखी वाढत गेला. मंदाताईंची उत्तुंग झेप महाराष्ट्राच्या राजकारणात छाप पाडून गेली.
मंदाताई यांच्या कार्यामुळेच त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. तेव्हाच नवी मुंबईची लेक महाराष्ट्राच्या राजकारणात छाप पडून गेली. विधान परिषदेच्या सभागृहात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने , वक्तृत्वाने सर्वानाच प्रभावित केले. जनतेचे प्रश्न कसे मांडावे , हे मंदाताईंना माहित होते. म्हणूनच त्यांना .सभागृहातील उत्कृष्ठ वक्ता म्हणून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. समाजकारणातील , राजकारणातील मंदाताईंचा आत्मविश्वास वृंधिगत झाला. त्यातूनच एका नव्या प्रभावी नेतृत्वाची झालेली ताईंच्या रूपाने महाराष्ट्राला पाहायला मिळाली.
२०१४ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने मंदाताईंना बेलापूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. मात्र, मंदाताईंनी दिग्ग्जना पराभूत करून विजयाची मशाल पेटविली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मंदाताईंनी विजयश्री खेचून आणली. मागील चार वर्षात मंदाताईंनी विकास कामांचा धडाका लावला आहे. नवी मुंबई कसेंट्रातील विविध कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी मंदाताईंनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. एखादे काम हाती घेतले कि ते काम पूर्ण होईपर्यंत त्या शांत बसत नाही.
नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करणे हा मंदाताईंच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक निर्णय आहे. साडेबारा टक्केच प्रश्न , भूमिपुत्रांच्या न्यायहक्काची लढाई , त्यांची नोकर भरती, मच्छिमार , मिठागर , शेतमजूर यांच्या न्यायहक्काची लढाई, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी वाढविलेल्या घरांचा प्रश्न आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंदाताई खंबीरपणे उभ्या आहेत.
मंदाताईंनी त्यांच्या कारकिर्दीत विविध उपक्रमांना चालना दिली आणि नवीन उपक्रम मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत/ नवी मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी बेलापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी १७ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. जलवाहतुकीसाठी १२० कोटींची निविदा मंजूर करून घेतली. मरिना प्रकल्प सुरु करण्यासाठी त्यांचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे. आमदार निधीचा विनियोग मंदाताईंनी नवी मुंबईकरांसाठी रुग्णवाहिका , शालेय विध्यार्थ्यांसाठी , झोपडपट्टी सुधार योजना लागू करण्यासाठी केला. त्या व्यतिरिक्त अनेक समाजउपयोगी , सार्वजनिक उपक्रमांसाठी मंदाताईंनी आमदार निधी दिला आहे.
मंदाताईंच्या कार्याचा आलेख उंचावत आहे. त्यांचे योगदान नवी मुंबई आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आहे. त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा !