पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : प्रलंबित विकास कामे पूर्ण करावी , मगच सिडकोने महापालिका क्षेत्रातील कारभार पनवेल मनपाकडे हस्तांतरित करावा, अशी मागणी शिवसेनेचे पनवेल तालुका संघटक भरत पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे लेखी निवेदनावर केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको क्षेत्र आणि गावठाणातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महापालिका आणि सिडको हि दोनदोन प्रशासन काम करीत असल्याने विकासाबाबत चालढकल पणा सुरु आहे. घनकचरा आणि आरोग्य विभाग पालिकेकडे हस्तांतरित झाले आहेत, मात्र इतर अनेक बाबी शिल्लक आहेत. गावठाण क्षेत्रातील सर्वे अद्यापि झालेला नाही. गावांच्या रस्ते , पदपथ , गटारे ,दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या व वसाहती मधील नागरिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केल्यानंतर अथवा पनवेल महानगरपालिकेने हमी दिल्यास हस्तांतरण करणे तसेच त्यापूर्वी नागरिकांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या हरकती मागविण्यात याव्यात, अशी मागणी भरत पाटील यांनी केली आहे.
कोकण दर्पण.
.