पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगराला मुबलक पाणी पुरवठा करावा, चांगले रस्ते, गटारे , दिवाबत्तीची सोय करावी, कचर्याचा आणि डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न, सोडवावा, महापालिकेतील कामगारांचे प्रश्न सोडवावेत, बेकायदा कामगार भर्ती थांबवावी, स्मशानभूमींमध्ये सुविधा द्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने पनवेल महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. नागरी सुविधा देण्यास पनवेल महानगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली असून येत्या महिनाभरात सर्व समस्या निकाली न काढल्यास शिवसैनिक प्रशासनाला खुर्चीवर बसून देणार नाहीत. असा इशारा खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी
दिला.
यावेळी उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी, महिला जिल्हा संपर्क संघटीका किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, शिरिष बुटाला, माजी जिल्हाप्रमुख माधवराव भिडे, रायगड जिल्हा संघटिका रेखा ठाकरे ,उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील,उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे,महानगर संघटक प्रथमेश सोमण, विधानसभा समन्वयक अरुणभाई कुरुप,विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संघटक भरत पाटिल, उपमहानगर संघटक सुनीत ठक्कर, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, उपमहानगरप्रमुख दीपक घरत , खारघर शहर प्रमुख शंकर ठाकूर , उपविभाग प्रमुख नंदू वारुंगसे , रामचंद्र देवरे , यांच्यासह पनवेल विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी,शिक्षकसेना पदाधिकारी,ग्राहकसंरक्षणक कक्षाचे पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी,जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगसेवक, सरपंच, ग्रा.पं.सदस्य आदी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या धडक मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात मुस्लीम महिलांची संख्या लक्षणिय होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रसाळ व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
सत्ताधारी फक्त खुर्च्या उबविण्याचे काम करीत आहे. परंतु यापुढे हा कारभार चालून देणार नाही व शिवसेना वेळोवेळी त्याचा जाब विचारेल असा इशारा यावेळी उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांनी दिला. तर महिला जिल्हा संपर्क संघटीका किशोरीताई पेडणेकर यांनी सांगितले की, आज महिलांना पाणी प्रश्नावरुन रस्त्यावर उतरावे लागत आहे. यावरुनच पाणी समस्या किती गंभीर आहे हे दिसून येते. असे असतानाही हे प्रशासन त्याची उपाय योजना करण्याऐवजी पाणी कपातीचे धोरण अवलंबवित आहे. हे पूर्णपणे चुकीचे असून प्रथम महानगरपालिकेने स्वतःचे धरण उपलब्ध करून घ्यायला हवे होते. नंतरच महानगरपालिका स्थापन करायला हवी होती असेही त्यांनी सांगितले. तर जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढून आज पनवेल परिसरात पाणी,कचरा, स्मशानभूमी तसेच डंम्पिंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात डोके वर काढत आहे. तसेच स्थानिक तरुणांना नोकर्या न देता बाहेरील कामगार भर्ती केले जात आहेत. हे यापुढे चालून देणार नाही. प्रथम स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे लागेल अन्यथा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.
या मोर्चाची दखल पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतली असून आगामी काळात सुधारणा न दिसल्यास पुन्हा एकदा रस्त्यावर उतरु व शिवसेनेची ताकद झोपलेल्या प्रशासनाला दाखवून देवू असा इशारा सुद्धा जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिला आहे.
कोकण दर्पण .