नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : बिहारी बांधवांच्या पत्नीबाबत अभद्र वक्तव्य करणाऱ्या बीड येथील भाजपचा आमदार सुरेश धस याची मस्ती उतरविणार असा निर्धार नवी मुंबईतील बिहार बांधवानी केला आहे. वाशी येथील शिवाजी चौकात बिहारी झारखंड रहिवाशी वेल्फेअर संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्च्यात बिहारी बांधवानी धस याच्या फोटोला चपलांनी हाणले. यावेळी बिहारी बांधवांसोबत अनेक मराठी बांधव देखील उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस वर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बिहारी बांधवानी केली.
यावेळी राजारा सिंह , सीपी प्रजापती , एन आर सिंह ,कपिल यादव , अजयकुमार तिवारी , दीपक चौधरी सह अनेक कार्यकर्ते तसेच विविध उत्तरभारतीय संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी पढाओ , बेटी बचाओचा नारा देतात आणि दुसरीकडे भाजपचा आमदार बिहारी महिलांबाबत अनुउद्गार काढतो. भाजपने धसवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. उत्तरभारतीय पुरुष इतरत्र राहतात आणि त्यांना गावाला मूल झाली कि इकडे पेढे वाटतात, असे अनुउद्गार धस ने काढले होते.
कोकण दर्पण.