Press "Enter" to skip to content

खाजगी विदयापीठातील गरीबांची नाकेबंदी उठवा – मान्यवरांचे मत ! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्ताने सत्याग्रह महाविदयालयात परिसंवाद संपन्न !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्ताने ‘‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ नामांतर: एक हिशेब तपासणी’’ यावर चर्चासत्र सत्याग्रह महाविदयालय, खारघर, नवी मुंबई येथील शांताबाई रामराव सभागृह, खारघर, नवी मुंबई येथे संपन्न झाले. नामांतराला २५ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने या परिसंवादाचे आयोजन ठेवण्यात आले होते असे या परिसंवादाचे संयोजक प्रा. अनिल गायकवाड, प्रा. संगीता जोगदंड यांनी सांगितले. या परिसंवादामध्ये प्रा. जान्हवी साल्पेकर, प्रा. ललिता यशवंते, प्रा. मंगेश कांबळे, प्रा. सोनाली सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

परिसंवादामध्ये नामांतराच्या १६ वर्षाची चळवळ आणि त्यानंतरच्या २५ वर्षात झालेल्या महाराष्ट्राती शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रामध्ये एका विदयापीठाच्या नामांतराला १६ वर्षे संघर्ष करावा लागला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला प्रादेशिक अस्मितेच्या कारणावरून विरोध करण्यात आला असे दाखविले जाते मात्र मराठवाडयातील अथवा मराठवाडयाबाहेरील मराठी आणि मराठवाडयाचा अस्मिता जपणाऱ्या नेत्या अथवा कार्यकत्र्यांनी एकही खाजगी अथवा अभिमत विदयापीठ मराठवाडयाच्या नावाने सुरू केले नाही. पण मराठवाडयातील कमल किशोर कदम सारख्या शिक्षण सम्राटाने महाराष्ट्राच्या कानाकोपÚयात खाजगी विदयापीठे काढली. मात्र त्याला मराठवाडा नाव दिले नाही अशी खंत परिसंवादात व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सध्या २९ पेक्षा जास्त खाजगी आणि अभिमत विदयापीठे असून आर्थिकदृष्टया दुबळयांना या विदयापीठाचे दरवाजे बंदच आहेत.
प्रा. जान्हवी साल्पेकर म्हणाल्या ‘‘ज्याच्या घरात नाही पीठ त्याला आहे सरकारी विदयापीठ !’’ आणि ‘‘ज्याच्या घरात आहे पीठ त्याला आहे खाजगी विदयापीठ !’’. त्या पुढे म्हणाल्या संवर्णाने स्थापन केलेल्या खाजगी विदयापीठात संवर्णाच्या गरीबांना सुध्दा नाकेबंदी विदयापीठ चालकांनी केली आहे. शाहु महाराजांच्या विचाराची मंडळी सुध्दा खाजगी विदयापीठात मागासवर्गीयांना नाडत आहेत असे त्या म्हणाल्या. ‘‘१० टक्के आर्थिक निकषावर सरकारी नोकरीतील आरक्षणाचा लाभ संवर्णाना मिळण्यासाठी खाजगी, अभिमत विदयापीठातील शिक्षण संवर्णासहीत मागासांना मोफत आणि मुक्त केल्याशिवाय संवर्णाचे आरक्षण कुचकामी आहे’’ असे साल्पेकर म्हणाल्या.
या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डाॅ.जी.के. डोंगरगांवकर यांनी समारोप केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ नामांतराचा लढा आणि त्यानंतरच्या काळाचा आढावा घेताना ते म्हणाले नामांतराच्या लढयाने दलित पॅंथरमधील नेत्यांचे पुनर्वसन झाले मात्र कार्यकर्ते आणि या चळवळीत शहीद झालेले लढवये विस्थापित आणि उपेक्षितच आहेत. ते पुढे म्हणाले आंबेडकर चळवळीच्या नेत्याने या चळवळीत घराणेशाही आणली असून या चळवळीला नाकेबंदीचे स्वरूप तयार झाले आहे. आंबेडकर चळवळीत कार्य करण्यासाठी इच्छुक असलेल्यांना अडगळीत आणुन आंबेडकर चळवळ कमकुवत करण्याचा ठेका रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी घेतला आहे असे डाॅ. डोंगरगांवकर म्हणाले. बापानंतर त्याच्या पोरांनी आंबेडकर चळवळीचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्न बाळगणे हे काही चुकीचे नाही मात्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी होण्याची पात्रता नसलेले सुध्दा नेते होवून ही चळवळ संपवतात त्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकराला अपेक्षित असलेली सत्ता मिळत नाही हा गेल्या 25 वर्षाचा वास्तव असल्याचे डाॅ. डोंगरगांवकर म्हणाले. आंबेडकर समाजातील निरक्षरता, बेकारी, दारिद्रय वाढत असून उच्च आणि व्यावसायिक शिक्षणातील प्रमाण खाजगीकरणामुळे घटत आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्रात आरक्षणाचा लढा आणि त्यासाठी सत्ता हा विषयच बाजुला टाकुन आहेÚयाचे गाणे गात बसणे हे समाजाला परवडणारे नाही असे या परिसंवादात डाॅ.जी.के. डोंगरगांवकर म्हणाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संकुल महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयात उभे राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्हयात 25 एकर जमिन आणि 500 कोटी रूपये दयावे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाला केंद्रिय विदयापीठाचा दर्जा दयावा असे ते म्हणाले. आभार प्राचार्या वनिता सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली असे कळविण्यात आले आहे.

कोकण दर्पण.