नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-२०१९ चा शुभारंभ सोहळा जल्लोषात पार पडला. सदर महोत्सवाचे उदघाटन माजी विरोधी पक्षनेते श्री. पंढरीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते नुकतेच सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदान येथे संपन्न झाले. बेलापूरच्या लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार सौ. मंदाताई म्हात्रे गेली 23 वर्षापासून सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमाबरोबर येथील कलाकार,विद्यार्थी व महिला यांच्या सुप्त कला गुणांसाठी नवी मुंबई कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करीत असतात. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार श्री. पंढरीनाथ पाटील यांनी नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सरोज पाटील यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका सरोज पाटील, उद्योगपती डॉ.दीपक बैद, कमल शर्मा, गुलबक्ष सिंग, महामंत्री डॉ. राजेश पाटील, महिलाध्यक्षा दुर्गा डोख, परिवहन सदस्य काशिनाथ पाटील, माजी जिल्हाध्यक्ष मारुती भोईर, भगवान ढाकणे, गोपाळ गायकवाड, संपत शेवाळे, सुनील पाटील, दीपक पवार, विकास सोरटे, महापालिका व्यासपीठावर उपस्थित होते. शनिवार दि. १२ जानेवारी पासून ते २० जानेवारी २०१९ या दरम्यान श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सी.बी.डी. बेलापूर येथे नवी मुंबई कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात आरोग्य शिबीर, नाट्य, संगीत, चित्रकला, पाककला, मेहंदी स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून संस्थेच्या अध्यक्ष मा.आ.सौ.मंदाताई म्हात्रे या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम व लोकापयोगी कामे करीत आहे.
यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सरोज पाटील यांनी सांगितले की, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून दरवर्षी कार्याक्रमचे आयोजन केले जाते. त्या माझ्या प्रभागात राहत असल्याने नेहमी मला त्यांचे सहाय्य लाभते. १० दिवसांच्या या महोत्सवामुळे सीबीडी-बेलापूर येथील नागरिकांना कार्यक्रमाची मेजवानी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाब कल्चरल असोशिएशनचे अध्यक्ष कमल शर्मा यांनी सांगितले कि, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा आनंद सीबीडी येथील नागरिकांना निशुल्क घेता यावा यासाठी आमदार मंदाताई यांच्या माध्यमातून गेली २३ वर्षे हा उपक्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या 30 वर्षापूर्वी जशा होत्या आजही त्या तशाच असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते व कार्यक्रमाचे उदघाटक श्री. पंढरीनाथ दादा पाटील यांनी सांगितले कि, पहिले गावागावात जत्रा भरली जात असे. परंतु आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून शहरी भागात 10 दिवस जत्रा भरविली जाते. या माध्यमातून सामाजिक वारसा जपणाऱ्या पहिल्या आमदार मी पहिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सौ. मंदाताई यांना राजकारणात सर्व प्रथम नगरसेवक पदाची तिकीट मी दिली होती व त्या संधीचे सोने त्यांनी करून दाखविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले कि, आमदार मंदाताई म्हात्रे आमदार झाल्यानंतर त्यांनी लावलेल्या कामांचा धडाका सर्व नागरिकांना माहित आहे. मी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. कोणीही व्यक्ती त्यांच्याकडे गेल्यास त्वरित ते काम मार्गी लावण्याचा त्यांचा उद्देश असतो. जी कामे गेली अनेक वर्षे प्रलंबित होती, जी कामे होणेच अशक्य होती, जी कामे करणे रथी महारथींना जमले नाही अशी कामे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी फक्त पटलावरच आणली नाहीत तर ती मार्गी लावली. ग्रामस्थांच्या घरांचा प्रश्न असो कि, शहरातील नागरिकांच्या घरांचा प्रश्न, झोपडपट्टी येथे राहणाऱ्या गरीब जनतेच्या घरांचा प्रश्नहि त्यांनी शिताफीने सोडविला. नुकताच फ्री होल्डचा प्रश्न मार्गी लावून त्यांनी मध्यमवर्गीयांच्या मनात घर केले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कोकण दर्पण.