नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : (जान्हवी साल्पेकर ) राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने सीबीडी नवी मुंबई येथे आयोजित केलेला सत्याग्रह महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोधी वृक्ष हि निसर्गाची अनमोल देणं आहे . बोधी वृक्ष हे २४ तास ऑक्सिजन देते , त्यामुळे `बोधी वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा` असा संदेश सत्याग्रह महोत्सवात सत्याग्रह महाविद्यालयाने दिला.
५, ६, ७ जानेवारी दरम्यान सीबीडी येथील अर्बन हाटमध्ये संपन्न झालेल्या सत्याग्रह महोत्सवाला दलितमित्र नागनाथराव कवठेकर, जयवंत ढवळे, डॉ भन्ते राहुल महाथेरो, उपकुलगुरू डॉ व्ही एम मगरे, माजी सचिव अल्पसंख्यानक मंत्रालय आर के गायकवाड ,प्राचार्य बी ए पाटील आदी प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे चेअरमन डॉ जी के डोंगरगावकर , संस्थेच्या रत्नमाला डोंगरगावकर , डॉ किरणकुमार कवठेकर , डॉ जयश्री कवठेकर , कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक उपस्थित होते.
यावेळी माता यशोधरा पुरस्कार उपासिका कांता रघुनाथ वानखेडे यांना देण्यात आला. एन एम वाघमारे यांना आदर्श रामजी पिता पुरस्कार देण्यात आला.
सत्याग्रह महोत्सवात सिद्धार्थ हायस्कुल , सत्याग्रह कॉलेज , सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय आणि नेल्सन मंडेला शाळा नागोठणे येथील विध्यार्थ्यानी सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता , देश सुरक्षा , पर्यावरण , पाय जवान जय किसान आदी विविध विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी विध्यार्थी आणि पालक मोट्या संख्येने उपस्थित होते.
सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्या वनिता सूर्यवंशी, प्रा.अनिल गायकवाड, प्रा. ललिता यशवंते , प्रा .इलोरा मित्रा, संगीता जोगदंड,प्रा.स्वाती राऊत ,डॉ निधी आगरवाल ,प्रा .प्रीती कांबळे ,प्रा.मंगेश कांबळे ,प्रा. सरिता काठे , मुख्याध्यापिका सुजाता भोसले ,अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या अलका कळसी , माध्यमिकच्या मंगल माने ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सत्याग्रह महोत्सवाचे सूत्रसंचालन , निवेदन प्राध्यापिका जान्हवी साल्पेकर , प्रा. सोनाली सूर्यवंशी , प्रा. अंकिता जांगीड यांनी केले.
कोकण दर्पण .