पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : आरोग्य आणि तंदुरुस्तीची समाजामध्ये जनजागृती व्हावी, या सामाजिक उद्देशाने यंदा ‘हम फिट तो इंडिया फिट’ ही संकल्पना घेऊन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३ जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या ‘खारघर मॅरेथॉन २०१९’ ची अर्थात अकराव्या मॅरेथॉनची तयारी पूर्ण झाली आहे.
या स्पर्धेमध्ये शुक्रवार दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारपर्यंत १० हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ‘खारघर मॅरेथॉन कमिटी’ चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ‘खारघर दौड’चे अध्यक्ष अर्जुन गरड, पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘अ’ चे अध्यक्ष अभिमन्यू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजकांची सर्व कमिटी सज्ज झाली असून आयोजन व नियोजनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
या स्पर्धेत स्पर्धकांच्या सेवेसाठी स्पर्धेचे प्रारंभ ठिकाण असलेल्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये ‘झुंबा डान्स’ चे स्टेज, पिण्याच्या पाण्याचे बुथ, प्रथोमपचार केंद्र, बक्षिस वितरण, स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक देण्याची व्यवस्था या सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या असून त्याचबरोबर स्पर्धेच्या मार्गात फिडींग पॉईंट, स्पंजिंग पॉईंट, प्रथोमपचार केंद्रे या व्यवस्थाही उभारण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी ‘सिडको महामंडळ व पनवेल महानगरपालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, रेडिओच्या माध्यमातून स्पर्धेच्या प्रचार व प्रसाराची जबाबदारी ‘९१. १ एफएम रेडिओ सिटी’ यांच्याकडे आहे. स्पर्धेचे डिजिटल पार्टनर ‘इनसाईन टेक्नोलोंजी, मिडिया पार्टनर ‘श्री जी ऍडव्हर्टाइझिंग’, सिनेमा पार्टनर ‘कार्निवल सिनेमा’, फिटनेस पार्टनर ‘फिजिक जीम’, तसेच स्पर्धेच्या काळात स्पर्धकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी ‘अपोलो हॉस्पिटल’, येरला हॉस्पिटल’ व ‘मदरहूड केअर’ हे तत्पर झाले असून स्पर्धकांना रिफ्रेशमेंटची जबादारी आयएनआयएफडी(INIFD), बायोट्रेक रिसर्च व डायनोस्टिक सेंटर, व एस टेनिस अकॅडेमी यांनी घेतली असून उत्तेजनवर्धक गोळ्या ‘सिप्ला लिमिटेड’ व उत्तेजनवर्धक पेय ‘रेड बुल’ कडून देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेमध्ये ‘व्हिनस’ कंपनीकडून प्रदूषणविरोधी मास्क देण्यात येणार असून या स्पर्धेतील स्पर्धकांना पायलटिंग करण्याची जबाबदारी ‘पॅन थंडर्स मोटरसायकल कलब’ यांच्याकडे आहे.
कोकण दर्पण
.